
दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या मासिक सभेची बातमी केल्यावरून स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर यांनी पत्रकारांशी हुज्जत घातली. अशी काय बातमी केली. मी सांगतो तशी बातमी कर आणि नगरध्यक्ष चेतन चव्हाण या सभेत अनुपस्थित होते असा उल्लेख कर आणि तशी बातमी कर असे बोल सुनावले. हा विषय पत्रकारांनी मासिक सभेत मांडला त्यावेळी सदर प्रकाराचा जाहीर निषेध सभागृहाकडून करण्यात आला. सभागृहाने आपण पत्रकारांच्या बाजूने आहे . तुम्ही काही घाबरू नका असे मत सभेचे अध्यक्ष देविदास गवस व सर्व नगरसेवकांनी सभेत मांडले.
कसई -दोडामार्ग नगरपंचायतची मासिक सभा मंगळवारी येथील सभागृहात चालू असताना घडलेल्या विषयावर पत्रकार ब्रेकिंग बातमी पाठवत होते. यावेळी भाजपच्या एका स्वीकृत नगरसेवकाने पत्रकारांना फोन करून अशी काय बातमी लिहिली.या सभेत नगराध्यक्ष चेतन चव्हाण अनुपस्थित आहेत असा बातमीत उल्लेख कर असे वक्तव्य करत बातमी करण्यास मज्जाव केला .
हा विषय पत्रकारांनी सभेत उपस्थित करत सभा त्याग करण्याचा विषय केला. यावेळी उपनगराध्यक्ष तथा सभेचे अध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, राजू प्रसादी, रामराव गावकर, पांडुरंग बोर्डेकर, व इतर नगरसेवकांनी सभेत विषय घेऊन सदर स्वीकृत नगरसेवकाच्याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला व तसा ठरावही घेण्यात आला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










