LIVE UPDATES

Bank Strike Over : देशातील बँकांचा ३ दिवसांचा देशव्यापी संप मागे, ग्राहकांना दिलासा

Bank Strike Deferred : आठवड्यातून पाच दिवस काम करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांबाबत 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने सोमवारपासून संप पुकारला होता. मात्र, 'इंडियन बँक्स असोसिएशन'कडून याबाबत आश्वासन मिळाल्यानंतर बँक युनियन्सनी रविवारी हा देशव्यापी तीन दिवसांचा संप स्थगित केला.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 28, 2026 15:32 PM
views 93  views
Bank employees and union representatives during talks over nationwide bank strike

नवी दिल्ली : सोमवारपासून सुरू होणारा तीन दिवसांचा बँकांचा संप मागे घेण्यात आला आहे. संप पुढे ढकलल्यामुळे सोमवारी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. 'इंडियन बँक्स असोसिएशन' आणि 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' यांमध्ये रविवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर हा संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

आठवड्यातून पाच दिवस काम करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांबाबत 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने सोमवारपासून संप पुकारला होता. मात्र, 'इंडियन बँक्स असोसिएशन'कडून याबाबत आश्वासन मिळाल्यानंतर बँक युनियन्सनी रविवारी हा देशव्यापी तीन दिवसांचा संप स्थगित केला.

सर्व शनिवार सुट्टीचे दिवस म्हणून जाहीर करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी 'इंडियन बँक्स असोसिएशन' आणि 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' यांचा समावेश असलेली एक उच्च-स्तरीय समिती त्वरित स्थापन केली जाईल, असे 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने एका निवेदनात म्हटले आहे. ही समिती ग्राहकांसह सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल.

समिती इतर पर्यायांवरही चर्चा करेल तसेच यामध्ये ग्राहक व इतर संबंधित घटकांचा सल्ला घेण्याचाही समावेश आहे. समितीने आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'च्या परिपत्रकात नमूद केलेली नाही. त्यामुळे, सध्यातरी बँकांचे कामकाज सध्याच्याच पद्धतीनुसार सुरू राहील आणि ग्राहकांना नेहमीप्रमाणे सेवा मिळत राहतील.