LIVE UPDATES

Banks Open on Sunday : बँक ग्राहकांना मोठा दिलासा, रविवारीही बँका राहणार सुरु

banks remain open on Sunday September 27 : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशव्यापी तीन दिवसांच्या बँक संपाची घोषणा केली आहे. २६ आणि २७ सप्टेंबर हे दिवस शनिवार-रविवार आहेत. जर त्या दोन्ही दिवशी आणि त्यानंतरच्या तीन दिवसांच्या संपामुळे बँका बंद राहिल्या असत्या तर ग्राहकांना सलग पाच दिवस शाखांच्या सेवांपासून वंचित राहावे लागले असते.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 24, 2026 17:56 PM
views 93  views
Public sector banks to remain open on September 27 2026 ahead of bank strike

नवी दिल्ली : सामान्यता बँका शनिवार आणि रविवारी बंद असतात. मात्र यावेळी रविवारी बॅंका सुरु राहणार आहेत. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत नियोजित असलेल्या तीन दिवसांच्या बँक संपामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रोख रकमेचे व्यवहार, धनादेश किंवा कागदपत्रे जमा करणे अशी तुमची काही तातडीची बँकेतील कामे असतील तर तुम्ही रविवारी करू शकता. इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि यूपीआय यांसारख्या डिजिटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. 

'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशव्यापी तीन दिवसांच्या बँक संपाची घोषणा केली आहे. २६ आणि २७ सप्टेंबर हे दिवस शनिवार-रविवार आहेत. जर त्या दोन्ही दिवशी आणि त्यानंतरच्या तीन दिवसांच्या संपामुळे बँका बंद राहिल्या असत्या तर ग्राहकांना सलग पाच दिवस शाखांच्या सेवांपासून वंचित राहावे लागले असते.

त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन अर्थ मंत्रालयाने रविवारी बँका उघड्या ठेवण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कामकाज रविवारी २७ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सुरु राहील.

भारतीय रिझर्व्ह बँकेने २७ सप्टेंबर रोजी बँक शाखा, कार्यालये, एटीएम-संबंधित युनिट्स आणि करन्सी चेस्ट्स कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. ग्राहकांना दीर्घकाळापर्यंत बँकिंग सेवांपासून वंचित राहू नये हा यामागचा उद्देश असल्याचे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, कोणत्या सेवा उपलब्ध असतील याची खात्री करण्यासाठी तुमच्या संबंधित शाखेशी आधीच संपर्क साधणे योग्य ठरेल.