LIVE UPDATES

Kankavli Land Dispute Assault Case : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी

परस्परविरोधी फिर्यादी दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 07:21 PM
views 19  views

कणकवली : तालुक्‍यातील तोंडवली-बोभाटेवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी अजित नाना बोभाटे (वय ४७) आणि दिलीप रामचंद्र बोभाटे (वय ५०) यांनी एकमेकांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. यात दोन्ही बाजूंनी शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि लाकडी दांडक्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. 

अजित बोभाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे दिलीप बोभाटे यांच्याशी जमिनीच्या कारणावरून वाद आहे. २३ नोव्हेंबरला सायंकाळी ते बागेतून घरी परतत असताना दिलीप बोभाटे हे वादग्रस्त जागेत घर बांधण्यासाठी जमिनीची आखणी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी अजित यांनी हातातील लाकडी रिपेचा तुकडा घेऊन जमिनीची मोजणी झाल्याशिवाय बांधकामासाठी आखणी करू नये, असे सांगितले.

यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी कामासाठी आलेल्या पांडू मोरये यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजित हे आपल्या घरी परतले असता दिलीप बोभाटे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दहा ते पंधरा जणांनी एकत्र येत शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही वेळाने दिलीप बोभाटे व त्यांचा मुलगा स्वप्निल यांनी हातातील लाकडी दांडक्यांनी आपल्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

स्वप्निल याने मानेखाली दांडक्याने मारल्याने भोवळ येऊन आपण खाली कोसळलो. त्यानंतरही मारहाण सुरूच राहिली. विलास बोभाटे यांनीही बांबूने मारल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.  तसेच आपल्याला फरफटत वाड्याच्या बाजूला नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. यावेळी नाकातून रक्तस्राव झाला. दिलीप बोभाटे यांनी दोरीने बांधण्याचा प्रयत्न केला तसेच पाठीवर व पोटात लाथा मारल्याचा आरोपही अजित यांनी केला आहे. तात्या निकम यांनी मध्यस्थी करून काही काळ मारहाण थांबविली; मात्र त्यांच्यानंतर पुन्हा मारहाण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत अजित यांचा चष्मा व एका पायातील चप्पल घटनास्थळी पडल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.  

दिलीप बोभाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्‍हटले आहे की,  त्यांचे सख्खे भाऊ दशरथ रामचंद्र बोभाटे हे सर्व्हे क्रमांक १८६ मधील खासगी जागेत नवीन घर बांधणार आहेत. या जागेतील आंब्याचे कलम व सागवानाचे झाड १४ नोव्हेंबरला जमिनीच्या साफसफाईदरम्यान तोडल्याने अजित बोभाटे यांनी शिवीगाळ व धमकी दिली होती.

याप्रकरणी अजित यांच्याविरोधात १५ नोव्हेंबरला कणकवली पोलीस ठाण्यात अदखलपात्र नोंद केल्याचे दिलीप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच वनविभागाकडेही अजित यांनी ई-मेलद्वारे तक्रार केल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. २३ नोव्हेंबरला सायंकाळी दशरथ बोभाटे यांच्या घराच्या बांधकामासाठी कंत्राटदार पांडू मोरये व त्यांचा एक कामगार जागेची आखणी करत होते. त्यावेळी अजित बोभाटे हातात लाकडी रिपेचा तुकडा घेऊन तेथे आले.

संबंधित जागा आपल्या मालकीची असल्याचे सांगत त्यांनी मोजणी केल्याशिवाय आखणी करू नये, असे सांगितले. यावेळी अजित यांनी लाकडी रिपेने उजव्या खांद्यावर मारून दुखापत केली. तसेच दोन्ही हातांनी मान पकडून जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी व हाताच्या ठोशांनी मारहाण केल्याचा आरोप दिलीप यांनी केला आहे. यावेळी दिलीप यांचा मुलगा स्वप्निल याने धाव घेऊन भांडण सोडविले. त्यानंतर प्रविण मोरये, तात्या निकम व विलास बोभाटे यांनी मध्यस्थी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दोन्ही फिर्यादीनुसार अजित नाना बोभाटे आणि दिलीप रामचंद्र बोभाटे यांच्यासह स्वप्नील बोभाटे, विलास बोभाटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास हवालदार सुभाष शिवगण करत आहेत.


ताजी बातमी

View all

देवगड किल्ला परिसरात गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा
November 25, 2026
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे परिसरात पावसाच्या हलक्या सरी
November 25, 2026
दोडामार्ग नगरपंचायतीच्या वाढीव कामावर तिसऱ्यांदा नगरसेवकांचा हातोडा
November 25, 2026
दहा दिवसांत दोडामार्ग-विजघर रस्त्याचे काम सुरू करा
November 25, 2026
संबंधित बातम्या

View all

देवगड किल्ला परिसरात गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा
November 25, 2026
Goa Excise Department seizes illegal liquor worth ₹32.40 lakh and a truck at Patradevi checkpost.
Patradevi Illegal Liquor Seizure : पत्रादेवी तपासणी नाक्यावर ५७.४० लाखांच्या अवैध दारुसह ट्रक जप्त
November 25, 2026
Container truck accident at Parshuram Ghat on the Mumbai-Goa Highway in Chiplun.
Parshuram Ghat Accident : परशुराम घाटात कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक
November 25, 2026
Police investigation following firing and machete attack outside Pune District Court in Shivajinagar.
Pune Court Firing Incident : पुणे जिल्हा न्यायालयाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला; एक व्यक्ती गंभीर जखमी, दोन बंदुका जप्त
November 25, 2026