
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत काल जो प्रकार घडला, तो अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलोय ते जनतेची कामं करण्यासाठी, पण प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यामध्ये समन्वयच नसल्याने सामान्य जनतेची कामं खोळंबली आहेत.मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी अपक्ष आहे. त्यामुळे माझी निष्ठा फक्त जनतेशी आहे, कोणत्याही पक्षाशी किंवा गटाशी नाही.हे प्रश्न राजकारणाचे नाहीत, हे गावाच्या विकासाचे प्रश्न आहेत.
यावर प्रशासनाने मनमानी करू नये. ३ कोटी ६० लाखांच्या रेन हार्वेस्टिंग कामावर, ११२ भजनी मंडळांच्या अनुदानावर स्पष्टता का नाही? याचं उत्तर प्रशासनाने दिलंच पाहिजे.जिल्हा परिषद आणि सत्ताधारी यांच्यात एकमत नसल्याचा फटका जनतेला बसतोय. सभा होतात, ठराव होतात, पण अंमलबजावणी होत नाही. हे मी खपवून घेणार नाही.
जे काम चांगलं असेल त्याला मी पाठिंबा देईन. जे काम चुकीचं असेल, त्याला मी जाब विचारणारच. हा माझा अपक्ष म्हणून अधिकार आहे आणि कर्तव्यही आहे.जनतेने मला अपक्ष म्हणून निवडून दिलंय, ते कोणाच्या तरी दबावाखाली काम करण्यासाठी नाही, तर निर्भीडपणे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी दिलंय.
त्यामुळे पुढच्या काळातही मी प्रत्येक सभेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम राहणार आहे.प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावं, हीच माझी विनंती आहे. नाहीतर जनतेच्या हितासाठी मला रस्त्यावर उतरून एल्गार करावा लागेल.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








