LIVE UPDATES

IRCTC Food : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आयआरसीटीसीचा जेवणाचा मेनू बदलला; जाणून घ्या नवे पर्याय

IRCTC catering services : याआधी प्रवाशांना खाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होते मात्र, नवीन मेनूमधून नाश्त्याचे आणि मुख्य पदार्थांचे काही पर्याय काढून टाकण्यात आले आहेत.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 24, 2026 04:22 PM
views 64  views
IRCTC introduces a new limited food menu in Vande Bharat Sleeper trains

नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जेवणाचा अनुभव बदलणार आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (IRCTC) रेल्वेतील अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी मेनू मर्यादित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रवाशांना आता नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी पूर्वीपेक्षा कमी पर्याय उपलब्ध असतील. सध्या हा प्रयोग तीन 'वंदे भारत' स्लीपर ट्रेन मार्गांवर प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा उपक्रम अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता यांबाबतच्या तक्रारी कमी करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला आहे. विमान कंपन्यांप्रमाणे मर्यादित मेनू ठेवल्यामुळे प्रत्येक पदार्थाच्या क्वालिटीवर लक्ष ठेवणे सोपे होते. अन्न तयार करण्याची जबाबदारी रेल्वे किंवा त्यांच्या कंत्राटदारांकडून काढून मोठ्या 'क्लाउड किचन'कडे सोपवण्यात आली आहे. यामुळे अन्नाच्या क्वालिटीवर अधिक चांगल्या प्रकारे देखरेख ठेवता येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षांत 'वंदे भारत'सह लांब पल्ल्याच्या रेल्वेमधील अन्नाच्या दर्जाबाबतच्या तक्रारींत वाढ झाली होती. प्रवाशांनी अन्न थंड किंवा शिळे मिळणे, तसेच जेवणात कीटक आढळणे अशा तक्रारी केल्या होत्या. आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे समूह सरव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले की, 'क्लाउड किचन'मधून अन्न पुरवण्यास सुरुवात केल्यापासून अन्नाशी संबंधित तक्रारींमध्ये १० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, प्रवाशांचे समाधान हे आयआरसीटीसीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. 

आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमानसेवेप्रमाणे मर्यादित मेनू ठेवल्यामुळे अनेक प्रकारच्या पदार्थांवर संसाधने विखुरण्याऐवजी काही निवडक पदार्थांच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करणे शक्य होते.

मुंबई-बेंगळुरू 'वंदे भारत' स्लीपर ट्रेनमध्ये नवीन मेनूमध्ये नाश्त्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. यात चटणी आणि सांबारसोबत इडली-वडा, पोहे किंवा उपमा. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात रोटी, भात, डाळ आणि एक मुख्य पदार्थ (मेन कोर्स) यांचा समावेश आहे. यामध्ये प्रवासी शाकाहारी किंवा मांसाहारी पर्यायांपैकी निवड करू शकतात.

याआधी प्रवाशांना खाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होते मात्र, नवीन मेनूमधून नाश्त्याचे आणि मुख्य पदार्थांचे काही पर्याय काढून टाकण्यात आले आहेत. आयआरसीटीसीनुसार, पूर्वी एका जेवणाचे वजन सुमारे ७०० ते ७५० ग्रॅम असायचे परंतु आता ते कमी करून अंदाजे ४५० ते ५०० ग्रॅम इतके करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Vengurla News : मातोंड देवी सातेरीचे लोकप्रतिनिधींनी घेतले दर्शन
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : दक्षिण कोकणचे पंढरपूर जत्रोत्सवासाठी सज्ज
November 24, 2026
TVS Jupiter 110 Dual-Tone scooter new top-end variant in India
टीव्हीएस ज्यूपिटर 110 स्पेशल एडिशन बंद; आता 'ड्यूअल टोन व्हेरिअंट' टॉप मॉडेल, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
डिचोलीत २९ नोव्हेंबरला भव्य सत्कार सोहळा
November 24, 2026
संबंधित बातम्या

View all

TVS Jupiter 110 Dual-Tone scooter new top-end variant in India
टीव्हीएस ज्यूपिटर 110 स्पेशल एडिशन बंद; आता 'ड्यूअल टोन व्हेरिअंट' टॉप मॉडेल, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sheikh Hasina return to Bangladesh : शेख हसीना यांचे बांगलादेशात पुनरागमन ?
November 24, 2026
West Bengal Assembly and proposed state name change to Paschim Banga.
पश्चिम बंगालचे नाव बदलणार? मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींची मोठी घोषणा, प्रस्ताव ९ डिसेंबरला मांडणार विधानसभेत
November 23, 2026
NSE and BSE stock markets to remain closed on November 24, 2026, for Guru Nanak Jayanti.
Stock Market Holiday : गुरुनानक जयंतीनिमित्त २४ नोव्हेंबरला शेअर बाजार बंद, बाजार पुन्हा कधी उघडणार? वाचा सविस्तर
November 23, 2026