LIVE UPDATES

Sheikh Hasina return to Bangladesh : शेख हसीना यांचे बांगलादेशात पुनरागमन ?

१६ डिसेंबरला ढाक्यात येण्याची घोषणा; भारतातून विमानाची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 24, 2026 01:28 PM
views 12  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

नवी दिल्ली :  बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना पुन्हा मायदेशी परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी १६ डिसेंबर रोजी बांगलादेशात परतण्याची घोषणा केल्याचा दावा त्यांच्या प्रवक्त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, भारतातील दिल्ली येथून ढाक्यापर्यंत प्रवास करण्यासाठी त्यांनी बांगलादेशच्या राष्ट्रीय विमान कंपनीकडे म्हणजेच बिमान बांगलादेश एअरलाईन्सकडे विमानसेवेची मागणी केली आहे.

शेख हसीना यांच्या या भूमिकेमुळे बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्यांच्या सुमारे १५ वर्षांच्या सत्ताकाळाचा त्यावेळी अंत झाला होता.

हसीना यांच्या प्रवक्त्यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, त्या १६ डिसेंबरला ढाका येथे परतण्याचा मानस व्यक्त करत आहेत. मायदेशी परतण्यासाठी आवश्यक विमानप्रवासाची व्यवस्था करणे ही बांगलादेश सरकारची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रवक्त्यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांना बांगलादेशच्या विमानाने भारतात आणण्यात आले होते. त्यामुळे आता भारतातून बांगलादेशात परतण्यासाठीही त्यांनी त्याच देशाच्या राष्ट्रीय विमान कंपनीकडे व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, १६ डिसेंबर हा बांगलादेशचा राष्ट्रीय विजय दिवस आहे. १९७१ मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. अशा महत्त्वाच्या दिवशी मायदेशी परतण्याची घोषणा केल्याने या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

मात्र, शेख हसीना यांच्या परतीच्या मागणीवर बांगलादेश सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाचा मार्ग कसा असेल आणि सरकार याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Ratnagiri Amba Ghat Tunnel : आंबा घाटात सहापदरी बोगदा उभारण्याचा प्रस्ताव
November 24, 2026
Ramayan movie ₹99 ticket offer on Guru Parv
Ramayan Movie Tickets 99 Rupees : 'या' दिवशी 'रामायण' चित्रपट पहा फक्त ९९ रुपयांत, निर्मात्यांची खास ऑफर
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Dodamarg News : तिलारी सुरक्षा रक्षक भरती अन्याया विरोधातील उपोषण स्थगित
November 24, 2026
संबंधित बातम्या

View all

West Bengal Assembly and proposed state name change to Paschim Banga.
पश्चिम बंगालचे नाव बदलणार? मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींची मोठी घोषणा, प्रस्ताव ९ डिसेंबरला मांडणार विधानसभेत
November 23, 2026
NSE and BSE stock markets to remain closed on November 24, 2026, for Guru Nanak Jayanti.
Stock Market Holiday : गुरुनानक जयंतीनिमित्त २४ नोव्हेंबरला शेअर बाजार बंद, बाजार पुन्हा कधी उघडणार? वाचा सविस्तर
November 23, 2026
Bisleri packaged drinking water bottle amid FSSAI investigation over bromate levels in water samples from Goa plant.
बिस्लेरीचं पाणी पिण्यासाठी असुरक्षित? चाचणीत नमुने फेल; कंपनीचंही स्पष्टीकरण समोर, वाचा सविस्तर
November 23, 2026
Supreme Court of India seeks Centre's response on restrictions on marriages between close blood relatives.
रक्ताच्या नात्यातील विवाहांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला महत्त्वाची सूचना
November 23, 2026