
कणकवली : सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असताना आज, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
आज सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार ८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ९ हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे.
आज जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा १ लाख २६ हजार ६९० रुपये इतका झाला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह प्रतिकिलो १ लाख ५३ हजार ४७० रुपयांवर आला आहे.दरातील या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, सोन्याचे दागिने खरेदी करताना घडणावळ आणि इतर शुल्क वेगळे आकारले जाऊ शकतात. तसेच शहरानुसार दरांमध्ये फरक असू शकतो.त्यामुळे आज सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी आपल्या जवळच्या सराफाकडून अंतिम दराची खात्री करून घ्या.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








