
नवी दिल्ली : शाओमीने भारतात रेडमी नोट 17 प्रो मॅक्स 5 जी ( Redmi Note 17 Pro Max 5G) स्मार्टफोन लॉन्च करण्याचे संकेत दिले आहेत. या फोनबाबत रेडमी इंडियाच्या सोशल मिडिया अकाऊंट्सवर माहिती देण्यात आली आहे. या फोनचे खास फिचर म्हणजे यामध्ये १०० वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी १०,००० एमएएचची सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये १२० हर्टझ रिफ्रेश रेटसह ६.८३ इंचाचा १.५ के एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठेतील या फोनच्या लॉन्चची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. रेडमी इंडिया या वेबसाईटवर या फोनचे लॅडिंग पेज तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 17 प्रो मॅक्स 5 जी मध्ये १२० हर्टझ रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा ६.८३ इंचाचा १.५ के एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच १०,००० एमएएचची सिलिकॉन कार्बन बॅटरी आणि १०० वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.
लॅडिंग पेजवर दिलेल्या माहितीनुसार, नोट 17 प्रो मॅक्स 5 जी मध्ये ३,५०० निट्सपर्यंतचा पीक ब्राइटनेस आणि डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास विक्टस 2 देण्यात आले आहे. उत्तम परफॉर्मंससाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 5 चिपसेट देण्यात आला असून याला ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी ते ५१२ जीबी पर्यंतचे स्टोरेज पर्याय देण्यात आले आहेत. हा फोन ऍन्ड्रॉईड 16 वर आधारित हायपरओएस 3 वर रन करणार असल्याने शाओमीच्या नवीन सॉफ्टवेअरचा अनुभव युजर्सना घेता येणार आहे.
फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये पाणी आणि धूळीपासून प्रोटेक्शनसाठी आयपी 66 आणि आयपी 68 रेटिंग्स देण्यात आले आहे. तसेच यात 5 जी, वाय फाय 6, ब्लूटूथ 6.0 आणि एनएफसी यांसारखी कनेक्टिव्हिटी फिचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे.
जपानमध्ये या जागतिक मॉडेलच्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 47,900 रुपये इतकी आहे, तर 8GB+512GB मॉडेलची किंमत सुमारे 59,900 रुपयांच्या आसपास आहे. दरम्यान, भारतातील किंमत वेगळी असू शकते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










