LIVE UPDATES

flight emergency landing : मोपा विमानतळावर इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानाचे 'इमर्जन्सी लॅंडिंग'

IndiGo Goa-Delhi flight : इंडिगोच्या या विमानात २२९ प्रवासी होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जेव्हा विमान गोव्याकडे परत वळले तेव्हा सकाळी ९:३० च्या सुमारास एटीसीने विमानतळावर 'पूर्ण इमर्जन्सी' जाहीर केली.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 01, 2026 13:30 PM
views 399  views
 Goa-Delhi Flight

पणजी : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोपा विमानतळावर सुरक्षितपणे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. या परिस्थितीमुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानतळावर 'पूर्ण इमर्जन्सी' जाहीर केली. इंजिनमधील बिघाडाचे नेमके स्वरूप काय होते, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 'इंडिया टुडे'ने याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे. त्यांच्या वृत्तानुसार, इंडिगोचे विमान ६ई २१०२ मंगळवारी सकाळी ९:१६ वाजता गोव्याहून दिल्लीसाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे विमान परत गोव्याला वळवण्यात आले आणि तिथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

पीटीआयच्या वृत्तानुसार, इंडिगोच्या या विमानात २२९ प्रवासी होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जेव्हा विमान गोव्याकडे परत वळले तेव्हा सकाळी ९:३० च्या सुमारास एटीसीने विमानतळावर 'पूर्ण इमर्जन्सी' जाहीर केली. 

विमानतळावरील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या या विमानात २२९ प्रवासी होते. विमानाचे सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग झाले असून प्रवाशांना नंतर दुपारी दुसऱ्या विमानाने दिल्लीला नेले जाणार आहे.