LIVE UPDATES

Mobile Puncture Repair Shop : चालत्या - बोलत्या पंक्चर दुकानाची कमाल

आपल्‍याला हे माहिती आहे का ?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 06:23 PM
views 85  views
Mangaluru man converts his two-wheeler into a mobile tyre puncture repair shop to help stranded motorists.

मंगलुरू : आपल्या देशात जुगाड आणि कल्पकतेची कमी नाही आहे. याचाच प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओतून दिसत आहे. कर्नाटकातील मंगलुरू शहरातील एका तरुणाने आपल्या दुचाकीलाच फिरते पंक्चरचे दुरुस्ती केंद्र बनवले आहे. त्याच्या या भन्नाट कल्पनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

अनेकदा प्रवास करताना अचानक गाडीचा टायर पंक्चर होतो. अशावेळी जवळपास मेकॅनिक नसेल तर वाहन ढकलत न्यावे लागते किंवा मदतीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागते. मात्र, मंगलुरूमधील या तरुणाने याच समस्येवर भन्नाट उपाय शोधला आहे. म्हणजेच पंक्चर काढण्यासाठी लागणारे जवळपास सर्व साहित्य त्याने दुचाकीवरच व्यवस्थित बसवले आहे.

एखाद्या वाहनचालकाची गाडी रस्त्यात पंक्चर झाली की हा तरुण थेट घटनास्थळी पोहोचतो आणि तिथेच दुरुस्ती करून देतो. या कल्पक व्यवसायाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या तरुणाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी किंवा महामार्गावर गाडी पंक्चर झाल्यास अशी सेवा खूप उपयोगी ठरू शकते, असे अनेकांनी म्हटले आहे. काहींनी तर प्रत्येक शहरात अशी सुविधा उपलब्ध असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, ही संकल्पना इतर शहरांमध्येही सुरू करण्याची तयारी असल्याचे पोस्ट शेअर करणाऱ्या युजरने सांगितले आहे. दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि जयपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये हा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांना स्कूटर उपलब्ध करून देण्याची ऑफर देण्यात आली आहे. 


ताजी बातमी

View all

सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट! पुढील ३ ते ४ तासांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता
November 02, 2026
Goa Chief Minister Dr. Pramod Sawant offering prayers at Shri Datta Maharaj Temple in Mangaon, Kudal, Sindhudurg.
Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत माणगावच्या श्री दत्त चरणी नतमस्तक
November 02, 2026
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’
November 02, 2026
Coal India subsidiary SECL files DRHP with SEBI for its proposed IPO of 66.81 crore shares.
SECL IPO 2026 : कोल इंडियाची मोठी घोषणा! एसईसीएलचा आयपीओ येणार बाजारात, ४ नोव्हेंबरला शेअर्सवर डिव्हिडंडची संधी
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

Coal India subsidiary SECL files DRHP with SEBI for its proposed IPO of 66.81 crore shares.
SECL IPO 2026 : कोल इंडियाची मोठी घोषणा! एसईसीएलचा आयपीओ येणार बाजारात, ४ नोव्हेंबरला शेअर्सवर डिव्हिडंडची संधी
November 02, 2026
Karbonn Rebel and Karbonn Rebel Pro smartphones launched in India with 7000mAh battery and 64MP camera.
भारतीय बाजारात १३ हजारांपेक्षा कमी किमतीत 'कार्बन'चे दोन स्मार्टफोन लॉन्च, ७००० एमएएच बॅटरीसह मिळणार खास फीचर्स
November 02, 2026
Hero Destini 110 Classic Edition scooter launched in India with new retro design, colour options and 110cc engine.
हिरोची नवीन 'डेस्टिनी ११० क्लासिक एडिशन' लॉन्च, नवा रेट्रो लूक अन् दमदार प्रीमियम फीचर्स; जाणून घ्या खासियत
November 02, 2026
Dog Dressed in Traditional Royal Costume During China's Dog Carrying Festival in Miao Village
China Dog Carrying Festival : येथे कुत्र्याला राजेशाही मान...
October 31, 2026