LIVE UPDATES

SECL IPO 2026 : कोल इंडियाची मोठी घोषणा! एसईसीएलचा आयपीओ येणार बाजारात, ४ नोव्हेंबरला शेअर्सवर डिव्हिडंडची संधी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 07:03 PM
views 61  views
Coal India subsidiary SECL files DRHP with SEBI for its proposed IPO of 66.81 crore shares.

नवी दिल्ली : कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या 'साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड'ने बाजार नियामक 'सेबी'कडे 'इनिशियल पब्लिक ऑफरिंग'साठी कागदपत्रे दाखल केली आहेत. १ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या 'ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस'नुसार, प्रस्तावित आयपीओ पूर्णपणे 'ऑफर फॉर सेल' स्वरूपाचा असेल. यामध्ये कंपनीचे प्रमोटर 'कोल इंडिया', ६६.८१ कोटींपर्यंतचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देतील. याद्वारे कोणतेही नवीन शेअर्स गुंतवणूकीसाठी जारी केले जाणार नाहीत. हा आयपीओ पूर्णपणे 'ऑफर फॉर सेल' असल्याने त्यातून मिळणारी संपूर्ण रक्कम 'कोल इंडिया'ला मिळेल आणि 'एसईसीएल'ला कोणताही निधी मिळणार नाही.

१९८५ मध्ये स्थापित आणि छत्तीसगडमधील बिलासपूर येथे मुख्यालय असलेली 'एसईसीएल' ही देशातील सर्वात मोठ्या कोळसा उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. कागदपत्रांनुसार, कंपनीने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १७.६२ कोटी टन कोळशाचे उत्पादन केले. जे देशाच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या १६.९४ टक्के इतके आहे.

सोमवारी 'कोल इंडिया'चे शेअर्स बीएसईवर ३९७.५० रुपयांवर ओपन होईल. दिवसाच्या सत्रात शेअरची किंमत ४०७.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. बाजार बंद होताना हा शेअर ४ टक्क्यांहून अधिक वाढीसह ४०७.४० रुपयांवर ट्रेड करत होता. गेल्या वर्षभरात या शेअरच्या किमतीत ४.८१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

'कोल इंडिया'चे शेअर्स ४ नोव्हेंबर रोजी 'एक्स-डिव्हिडंड' होणार आहेत. कंपनीने प्रति शेअर १०.२५ रुपयांचा अंतरिम डिव्हीडंट देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, सप्टेंबर महिन्यात कंपनीचे शेअर्स 'एक्स-डिव्हिडंड' झाले होते. तेव्हा योग्य गुंतवणूकदारांना प्रति शेअर ५.२५ रुपयांचा फायनल डिव्हिडंड देण्यात आला होता.


ताजी बातमी

View all

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर
November 02, 2026
विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचा तिसरा दीक्षांत समारंभ उत्साहात
November 02, 2026
वैभववाडीत सलग दुसऱ्या दिवशी धुवांधार पाऊस
November 02, 2026
सावंतवाडीची बाजारपेठ दिवाळीच्या खरेदीसाठी सज्ज
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

Mangaluru man converts his two-wheeler into a mobile tyre puncture repair shop to help stranded motorists.
Mobile Puncture Repair Shop : चालत्या - बोलत्या पंक्चर दुकानाची कमाल
November 02, 2026
Karbonn Rebel and Karbonn Rebel Pro smartphones launched in India with 7000mAh battery and 64MP camera.
भारतीय बाजारात १३ हजारांपेक्षा कमी किमतीत 'कार्बन'चे दोन स्मार्टफोन लॉन्च, ७००० एमएएच बॅटरीसह मिळणार खास फीचर्स
November 02, 2026
Hero Destini 110 Classic Edition scooter launched in India with new retro design, colour options and 110cc engine.
हिरोची नवीन 'डेस्टिनी ११० क्लासिक एडिशन' लॉन्च, नवा रेट्रो लूक अन् दमदार प्रीमियम फीचर्स; जाणून घ्या खासियत
November 02, 2026
Dog Dressed in Traditional Royal Costume During China's Dog Carrying Festival in Miao Village
China Dog Carrying Festival : येथे कुत्र्याला राजेशाही मान...
October 31, 2026