
नवी दिल्ली : ओमानच्या किनारपट्टीजवळ सोमवारी भारतीय ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत जहाजावरील एक भारतीय खलाश्याचा मृत्यू झाला असून इतर १३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, 'एमएसव्ही अल जुसुफी' (MSV AL JUSUFI) हे भारतीय जहाज ओमानच्या किनारपट्टीवरून जात असताना एका अज्ञात हवाई ऑब्जेक्टने त्यावर हल्ला केला. जहाजावर १४ भारतीय खलाशी होते. हल्ल्यात जखमी झालेल्या एका खलाशाला वाचवता आले नाही. गंधार नहिम अजीज रा. गुजरात या खलाश्याचा मृत्यू झाला आहे.
ओमानच्या तटरक्षक दलाद्वारे १३ खलाशांची सुटका
सर्बानंद सोनोवाल यांनी 'एक्स' (X) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, १३ खलाशी सुरक्षित ठिकाणी पोहोचले असून ओमानच्या तटरक्षक दलाने त्यांची सुटका केली आहे. ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि सुखरूप सुटका झालेल्या सर्व १३ भारतीय खलाशांना आवश्यक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे.
ओमानच्या किनारपट्टीजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, "ओमानमधील लिमा जवळ सोमवारी संध्याकाळी 'एमएसव्ही अल-युसुफी' (MSV Al-Yusufi) या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या जहाजावर १४ भारतीय नागरिक होते. त्यापैकी १३ जणांची सुटका करण्यात आली आहे, तर एका जखमी भारतीय नागरिकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. आम्ही आमच्या संवेदना व्यक्त करतो. ओमानमधील आमचे दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि ओमानच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. सुखरूप सुटका झालेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणणे आणि मृत खलाश्याचा मृतदेह परत आणणे शक्य होईल. या भागात व्यापारी जहाजांवर वारंवार होणारे हल्ले अत्यंत चिंतेची बाब आहेत."
⚠️ IMPORTANT UPDATE ⚠️ On Nov 2, the Indian MSV AL JUSUFI, carrying 14 Indian seafarers, was struck by an unidentified aerial object while navigating near the coast of Oman. While 13 crew members safely evacuated and were rescued by the Omani Coast Guard, I am deeply saddened to report that one of our seafarers, Gandhar Nahim Ajij from Gujarat, tragically succumbed to his injuries. My heartfelt condolences go out to his family and loved ones during this hour of immense grief. The Ministry and Indian Embassy in Oman are in contact with local authorities to ensure immediate assistance for the 13 survivors and facilitate the swift repatriation of both the surviving crew and mortal remains of our deceased seafarer.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) November 3, 2026
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








