
सावंतवाडी : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा (आयुष मंत्रालय, भारत सरकार) आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्यावतीने सावंतवाडी येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडीतील नवीन एक्स्टेंशन ओपीडीच्या शुभारंभ निमित्ताने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, याद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळणार आहेत.
उद्या सकाळी माजी मंत्री, आम. दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, सर्व सभापती व नगरसेवक यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावरील जागेत हा कार्यक्रम होणार असून शिबीर देखील होणार आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोव्याचे संचालक प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती यांच्या विशेष उपस्थितीत हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. प्रशांत ससाणे हे काम पाहणार आहेत.
सावंतवाडी परिसरातील ग्रामस्थांना व नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी संस्थेचे अनेक डॉक्टर व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार असून, त्यात डॉ. स्वाती गायकवाड (सहयोगी प्राध्यापक, PTSR), डॉ. प्रशांत ससाणे (सहाय्यक प्राध्यापक, कायचिकित्सा), डॉ. दीपक ए. एस. (सहाय्यक प्राध्यापक, शल्य), डॉ. दत्तात्रय पवार (वैद्यकीय अधिकारी) स्टाफ नर्स पूजा जोळंबेकर, स्वप्नील खावडकर, फार्मासिस्ट दर्शन सावंत इतर सहायता कर्मचारी वर्ग असणार आहेत.
सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा व एक्स्टेंशन ओपीडीच्या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या ओपीडीमुळे मोठा फायदा रुग्णांना होणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








