
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ ऑकलंडच्या 'ईडन पार्क'वर पोहोचला तेव्हा तीन दिग्गज भारतीय खेळाडूंना एका क्रीडा दिग्गज खेळाडूने खास 'ब्लॅक जर्सी' भेट दिली.
कर्णधार शुभमन गिल, माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांना न्यूझीलंडच्या खेळाडूने खास 'ब्लॅक जर्सी' भेट दिली. या जर्सींवर रोहित, विराट आणि गिल यांची नावे लिहिलेली होती.
पहिल्या एकदिवसीय सामन्याचे यजमानपद भूषवणारे 'ईडन पार्क' मैदान हे प्रामुख्याने रग्बीसाठी ओळखले जाते. तसेच येथे फुटबॉलचे सामनेही खेळवले जातात. क्रिकेट सामन्यांसाठी येथे 'ड्रॉप-इन' पिचचा वापर केला जातो. त्यामुळे या मैदानावर बाउंड्री ही अत्यंत लहान आहेत. तसेच या मैदानाला आधीच क्रिकेटसाठी अधिकृत दर्जा देण्यात आला होता.
न्यूझीलंडच्या राष्ट्रीय रग्बी संघाला 'ऑल ब्लॅक्स' (All Blacks) म्हणून ओळखले जाते. ऑकलंडमधील पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या सुरुवातीला विराट कोहली, शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांची भेट न्यूझीलंडच्या रग्बी संघातील दिग्गज खेळाडू केवेन मेलामु सोबत झाली. या खेळाडूने तीन भारतीय स्टार खेळाडूंना त्यांच्या नावाच्या खास रग्बी जर्सी भेट दिल्या.
याबाबत बीसीसीआयने आपल्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवर या भेटीची माहिती देताना म्हटले आहे की, "सामना सुरू होण्यापूर्वीचा एक खास क्षण! कर्णधार शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी न्यूझीलंडचे रग्बी दिग्गज केवेन मेलामु यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून खास रग्बी जर्सी स्वीकारल्या."
A special moment before the start of play 🇮🇳🇳🇿 Captain @ShubmanGill, @imVkohli and @ImRo45 meet with the legendary Keven Mealamu, a titan of New Zealand rugby and are presented with personalized rugby jerseys. #TeamIndia | @AllBlacks https://t.co/Kw8OLfk1N9
— BCCI (@BCCI) November 4, 2026
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








