LIVE UPDATES

Omkar Elephant : ओंकार हत्तीची वेंगुर्ला तालुक्यात एंट्री

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 07:18 PM
views 930  views
Wild elephant Omkar spotted in Hodawada village of Vengurla taluka in Sindhudurg district.

वेंगुर्ला : ओंकार हत्तीने अखेर वेंगुर्ला तालुक्यात एंट्री केली असुन बुधवारी दुपारी 1.30 ते 2 वा. च्या सुमारास होडावडा न्हईकरवाडी येथे दाखल झाला. नेमळे, आकेरी, झाराप भागातून होडावडा येथे "ओंकार " दाखल झाल्यानंतर काहीसे भीतीचे वातावरण असले तरी ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची ओंकारला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

त्यानंतर तो तळवडे खेरवाडी भागात गेल्याची माहिती होडावडा येथील ग्रामस्थांनी दिली. यावेळी वनविभाग अधिकारी, आरआरटी टीम, वेंगुर्ला वनपाल संदिप हजारे, वनरक्षक प्रवीण कमळकर, नेरूर तर्फ हवेली वनपाल सूर्यकांत सावंत, वनमजूर, वन कर्मचारी तसेच होडावडा भाजपा बूथ अध्यक्ष प्रसाद परब, माजी सरपंच अदिती नाईक, रमाकांत दळवी, अरुण धुरी, सद्गुरू दळवी, सत्यवान दळवी, मिथुन नाईक आदी उपस्थित होते. सावंतवाडी वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनीही नेमळे येथे भेट दिली होती.