
सावंतवाडी : माजगांव येथील सुप्रसिद्ध शिल्पकार काका सावंत व पेंटर एस.टी सेवानिवृत्त मंगेश सावंत यांच्या विनामूल्य सहकार्यातून मोती तलावाच्या काठी उभारण्यात आलेल्या श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याला रंगरंगोटी करण्यात आली.
तीन वर्षांपूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सदर पुतळ्याची रंगरंगोटी केली होती त्यासाठी सुद्धा काका सावंत यांनी विनामूल्य पेंटिंग करून सहकार्य केले होते. कालांतराने पुतळ्यावरील रंग खराब झाल्या कारणाने याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी पुन्हा एकदा युवराज लखमराजे यांच्या परवानगीने पुतळ्याचे काम विनामूल्य पूर्ण करून दिले. यासाठी नगरपरिषदेचे स्वच्छता अधिकारी दीपक म्हापसेकर यांनी सहकार्य केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








