LIVE UPDATES

Air India Flight Hijack Threat : एअर इंडियाच्या विमानात खळबळ! वॉशरूममध्ये सापडली अपहरणाच्या धमकीची चिठ्ठी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 01:57 PM
views 76  views
Air India aircraft moved to isolation bay after hijack threat note found on Kolkata-Mumbai flight.

मुंबई : एअर इंडियाच्या एका विमानात हायजॅकची धमकी देणारी चिठ्ठी सापडल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी घडली. ही चिठ्ठी सापडल्यानंतर विमानतळावरील एका सुरक्षित आणि आयसोलेटेड ठिकाणी विमान हलवण्यात आले. सुदैवाने विमानात असलेले सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्रशासनाने विमानाची तपासणी सुरू केली आहे. हे विमान पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून मुंबईच्या दिशेने जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाताहून मुंबईला जाणारे हे विमान सुरक्षेच्या धोक्याची सूचना मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी एका आयसोलेशन बे मध्ये हलवण्यात आले. विमानात एक चिठ्ठी सापडल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून एसओपी राबवण्यात येत आहेत.

धमकावणारी चिठ्ठी सापडल्याने खळबळ

वृत्तसंस्था 'आयएएनएस'ने मुंबई पोलिसांमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाणासाठी सज्ज असलेल्या एका विमानात धमकीवजा चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली होती. विमान उड्डाण करण्यापूर्वीच वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले.

कोलकाता विमानतळाचे संचालक विक्रम सिंग यांनी सांगितले की, विमानात एक धमकीवजा चिठ्ठी सापडली .यामध्ये सकाळी ११:१० वाजता विमान हायजॅक केले जाईल असा उल्लेख होता. विमान उड्डाण करण्यापूर्वी वॉशरूममध्ये ही चिठ्ठी सापडली. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले आणि विमान एका आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले.


ताजी बातमी

View all

Incomplete road construction work on the Tilari to Vijghar road in Dodamarg, Sindhudurg.
तिलारी-विजघर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात गुरूवारी रास्ता रोको आंदोलन
November 11, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
तुमचा व्यवसाय, आमचा सपोर्ट EXPLORE KONKAN
November 11, 2026
CRPF jawans deployed in Kulgam after terrorist attack in Jammu and Kashmir.
Kulgam Terror Attack : सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला
November 11, 2026
India U19 vs Afghanistan U19 and Pakistan U19 vs Bangladesh U19 semifinal matches in U19 Asia Cup 2026.
भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? अंडर-19 आशिया कपच्या फायनलचे समीकरण जाणून घ्या
November 11, 2026
संबंधित बातम्या

View all

CRPF jawans deployed in Kulgam after terrorist attack in Jammu and Kashmir.
Kulgam Terror Attack : सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला
November 11, 2026
IIT Delhi launches six-month AI and Cyber Security certificate course for working professionals.
नोकरीसोबत एआय, सायबर सुरक्षेचे शिक्षण घेण्याची संधी! ६ महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स, जाणून घ्या सविस्तर
November 06, 2026
India's indigenous Pralay quasi-ballistic missile developed by DRDO
Pralay Missile Test : भारताची सामरिक ताकद वाढणार! डीआरडीओच्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
November 06, 2026
Kadamba Transport Corporation employees in Goa announce a 24-hour strike from November 12 over 18 pending demands.
Kadamba Transport Employees Strike : गोव्याच्या कदंब परिवहन कर्मचाऱ्यांचा १२ नोव्हेंबरपासून संपाचा इशारा
November 05, 2026