
नवी दिल्ली : जर तुम्ही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी नवीन एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिप इंडिया ऑक्टोबर २०२४ मध्ये आपल्या विविध मॉडेल्सवर मोठा डिस्काउंट देत आहे. याचाच एक भाग म्हणून, कंपनीची लोकप्रिय ७ सीटर एसयूव्ही 'जिप मेरिडियन' आता खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे.
या काळात ग्राहक 'जिप मेरिडियन'वर १.६५ लाख रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. या ऑफरमध्ये रोख सवलतीसोबतच इतर फायदेही समाविष्ट आहेत. सवलतीबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात.
कारचे डिझाईन
ही कार अतिशय आकर्षक आणि भव्य डिझाइनसह येते. समोरून पाहिल्यास, तिची वैशिष्ट्यपूर्ण ७ स्लॉट ग्रिल आणि आकर्षक एलईडी हेडलाइट्स तिला एक प्रीमियम लूक देतात. कारचे आतील भागही तितकेच आलिशान आहे. यात तीन रांगांमध्ये बसण्याची सोय आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आरामात बसू शकते. याच्या केबिनमध्ये प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री, मोठे सनरूफ आणि ॲपल कारप्ले व अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारी १०.१ इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे.
पॉवरट्रेनच्या बाबतीत 'जिप मेरिडियन' अत्यंत विश्वासार्ह आहे. यात २.०-लिटरचे डिझेल इंजिन दिले आहे, जे १७० बीएचपीची पॉवर आणि ३५० एनएमचा टॉर्क जनरेट करते. ही कार ६ स्पीड मॅन्युअल किंवा ९ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या पर्यायांसह उपलब्ध आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने, जीपने ही कार अत्यंत मजबूत आणि सुरक्षित बनवली आहे. यात ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांसारखे फिचर्स आहेत. याचे सस्पेंशन उत्कृष्ट आहे, त्यामुळे खराब रस्त्यांवरही धक्के जाणवत नाहीत.
'जिप मेरिडियन'ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे २३.३३ लाख रुपये आहे, तर टॉप-एंड मॉडेलची किंमत सुमारे ३८.२६ लाख रुपयांपर्यंत जाते. विशेष म्हणजे, Jeep Meridian ही टोयोटो फॉर्च्युनर पेक्षा अधिक परवडणारी आहे. तरीही, वैशिष्ट्ये आणि ड्रायव्हिंग डायनॅमिक्सच्या बाबतीत ती फॉर्च्युनरला जोरदार टक्कर देते.
(डिस्क्लेमर : कारवरील डिस्काउंट्स तुमचे शहर किंवा डीलरशिपनुसार बदलू शकतात.)
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










