
वेंगुर्ला : संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळाच्या संकटावर मात करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या वतीने ठोस पावले उचलली आहेत. पंचायत समिती वेंगुर्ला व ग्रामपंचायत मातोंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय 'वनराई बंधारा' शुभारंभ कार्यक्रम मातोंड येथील झरी या ठिकाणी पार पडला.
आज २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी हा वनराई बंधारा घालण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, तहसीलदार ओंकार ओतरी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, पंचायत समिती सदस्या सुचिता वजराटकर, संकेत धुरी, तसेच मातोंडच्या सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
पाणी साठवणूक आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी वनराई बंधारे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. या उपक्रमामुळे परिसरात पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी सभापती शंकर घारे यांनी सांगत तालुक्यातील शेतकरी बांधव, ग्रामस्थाना जास्तीत जास्त वनराई बंधारे घालण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी अजय ढाणे, विद्यानंद देसाई, पाणीपुरवठा अधिकारी प्रफुल्लकुमार शिंदे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रीतम पवार, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, कृषी विस्तार अधिकारी सुप्रिया कोरगावकर, शर्मिष्ठा सामंत, गीता परब, अमोल कावले, शंकर नाईक, श्री. पाटील, मातोंड उपसरपंच वैभवी परब, पंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे, माजी सरपंच जानवी परब, माजी उपसरपंच आनंद परब, ग्रामपंचायत सदस्या किशोरी परब, सुजाता सावंत यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.












