LIVE UPDATES

BSNL Recharge Plans : बीएसएनएलची भन्नाट ऑफर! 'या' दोन प्लॅनसोबत 1 लाखांचा इन्श्युरन्स अन् सायबर फ्रॉडपासून प्रोटेक्शन

BSNL Recharge Plans With Free Insurance Cover : विशेष म्हणजे ग्राहकांना यासाठी कोणताही अतिरिक्त विमा हप्ता (premium) भरावा लागणार नाही. ग्राहकांना हा लाभ रिचार्जच्या किमतीतच समावेश असेल.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 02, 2026 13:04 PM
views 169  views
BSNL recharge plans with free insurance and cyber fraud protection

नवी दिल्ली : जर तुम्ही बीएसएनएलचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी मालकीच्या या टेलिकॉम कंपनीने काही निवडक प्रीपेड प्लॅन्ससोबत मोफत विमा संरक्षण (insurance cover) देण्यास सुरुवात केली आहे.

तसेच ऑनलाइन फ्रॉड किंवा सायबर फसवणुकीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणासाठी यात 10,000 रुपयांपर्यंतचे सायबर फ्रॉड प्रोटेक्शनचा (cyber fraud protection) देखील समावेश आहे. ही सेवा देण्यासाठी बीएसएनएलने 'द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' (OICL) सोबत भागीदारी केली आहे. सायबर फ्रॉड प्रोटेक्शनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाचा बीएसएनएल मोबाइल नंबर त्यांच्या बँक अकाऊंटशी जोडलेला असणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे ग्राहकांना यासाठी कोणताही अतिरिक्त विमा हप्ता (premium) भरावा लागणार नाही. ग्राहकांना हा लाभ रिचार्जच्या किमतीतच समावेश असेल. सध्या ही सुविधा एसटीव्ही 202 रुपये आणि एसटीव्ही 2449 रुपयांच्या प्लॅन्ससोबत उपलब्ध आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये अपघाती मृत्यू झाल्यास 1 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.

बीएसएनएलने ही विमा सुविधा प्रत्येक रिचार्ज प्लॅनसोबत दिलेली नाही. सध्या केवळ 202 रुपये आणि 2449 रुपयांच्या प्लॅन्सवर हे लाभ मिळणार आहेत. जर तुम्ही यापैकी कोणत्याही प्लॅनने तुमच्या बीएसएनएल नंबरचे रिचार्ज केले तर तुम्हाला प्लॅनसोबतच विम्याचा लाभही मिळेल. या ऑफरचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना विम्यासाठी कोणताही वेगळा प्रीमियम भरावा लागत नाही. रिचार्ज पूर्ण झाल्यानंतर हे विमा संरक्षण आपोआप ऍक्टिव्हेट होते. विम्याशी संबंधित तपशील ग्राहकाला एसएमएसद्वारे पाठवले जातील.

202 रुपयांचा चा प्लॅन हा विमा सुविधा असलेला सर्वात स्वस्त पर्याय आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवस आहे. यात ग्राहकांना एकूण 300 मिनिटांचे व्हॉइस कॉलिंग, 5जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. यासोबतच, यात 1 लाख रुपयांपर्यंतचे अपघाती मृत्यू संरक्षण आणि 10,000 रुपयांपर्यंतचे सायबर फ्रॉड प्रोटेक्शन मिळते. 

तर 2,449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सोबतच दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा मिळते. या योजनेमध्ये १ लाख रुपयांपर्यंतचे अपघाती मृत्यू संरक्षण आणि १०,००० रुपयांपर्यंतचे सायबर फ्रॉड प्रोटेक्शन यांचाही समावेश आहे.