
जेरुसलेम : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या 'फ्लायदुबई' (Flydubai) विमानातील भारतीय कॅप्टनने सह-पायलटचा (को-पायलट) सामना करून एक मोठी दुर्घटना टाळली. हा सह-पायलट कथितरीत्या विमान कोसळवण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेमुळे विमानाला सौदी अरेबियामध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
इस्रायली प्रसारमाध्यमांनी बुधवारी ही माहिती दिली. इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने 'वायनेट' (Ynet) या न्यूज वेबसाइटने वृत्त दिले आहे की, सह-पायलट हा ओमानचा नागरिक असून त्याने विमान पाडण्याचा प्रयत्न केल्याचा संशय होता. सौदी अरेबियात उतरल्यानंतर हे विमान आता सुरक्षितपणे इस्रायलला पोहोचले आहे.
वृत्तानुसार, विमान कोसळण्यापासून वाचवण्यासाठी भारतीय कॅप्टनने सह-पायलटशी झटापट केली आणि नंतर इस्रायली प्रवाशांनी त्याला नियंत्रणात आणण्यास मदत केली.
'फ्लायदुबई'ने दुजोरा दिला की, विमान प्रवासादरम्यान विमानात एक घटना घडली आणि ते तबुकमध्ये सुरक्षितपणे उतरले. एअरलाइनने सांगितले की, ते संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहेत आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र, एअरलाइनने पायलट्सची ओळख किंवा राष्ट्रीयत्व उघड केलेले नाही.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, एका पायलटवर दुसऱ्या पायलटने चाकूने हल्ला केला आणि प्रवाशांनी भरलेले विमान पाडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. विमान प्रवासादरम्यान इस्रायलच्या दिशेने जाणाऱ्या विमानात एका पायलटवर दुसऱ्या पायलटने चाकूने हल्ला केला आणि प्रवाशांनी भरलेले विमान पाडण्याचा प्रयत्न केला."
त्यांनी सांगितले की, एका इस्रायली प्रवाशाने माहिती दिली की विमान गोल फिरू लागले आणि खाली येऊ लागले. त्यानंतर, एक प्रवासी आणि एक क्रू सदस्य कॉकपिटमध्ये जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी चाकू वापरणाऱ्या व विमानाची कंट्रोल सिस्टिम निकामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पायलटला नियंत्रणात आणले.
नेतन्याहू यांच्या म्हणण्यानुसार, "त्यानंतर आणखी एक क्रू सदस्य कॉकपिटमध्ये गेला आणि त्याने विमान स्थिर करण्यास मदत केली. असाधारण प्रसंगावधान आणि धैर्य दाखवणाऱ्या त्या नायकांना मी सलाम करतो. त्यांनी अनेक जीव वाचवले आणि मोठी दुर्घटना टाळली."
त्यांनी सांगितले की, विमान सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










