LIVE UPDATES

कुडाळ नगरपंचायतीतर्फे अभिनव नगर येथे स्वच्छता मोहीम

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 01, 2026 13:20 PM
views 72  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ : 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने अभिनव नगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यालगतची अस्वच्छता दूर करण्यात आली आहे. केवळ झाडे-झुडपे काढण्यावरच न थांबता, जेसीबीच्या साहाय्याने परिसरातील  कचरा साफ करण्यात आल्याने या भागाचा कायापालट झाला असून परिसर आता स्वच्छ व सुंदर दिसू लागला आहे.

अभिनव नगर येथील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडी-वेली वाढल्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली होती. तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत कुडाळ नगरपंचायतीने तातडीने मोहीम हाती घेतली.या मोहिमेत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यालगतची सर्व झाडी व कचरा साफ केला. 

याचसोबत जेसीबी यंत्राचा वापर करून रस्त्यालगत असलेला कचरा उचलून साफ करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना दिसणारी अस्वच्छ व विद्रूप परिस्थिती दूर होऊन संपूर्ण परिसर अत्यंत सुटसुटीत आणि आल्हाददायक दिसत आहे.

सदर स्वच्छता मोहीम कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर आणि नगरसेविका नयना मांजरेकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारीही उपस्थित होते.नगरपंचायतीच्या या तत्पर कामगिरीबद्दल आणि अभिनव नगरचा स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्षा, नगरसेविका व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.