LIVE UPDATES

तायक्वांदो स्पर्धेत मुशेब पटेलची विभागीय स्तरावर निवड

बॅ. नाथ पै कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 01, 2026 13:47 PM
views 39  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ: क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत बॅ. नाथ पै कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२ वी मधील विद्यार्थी कु. मुशेब पटेल याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. १९ वर्षाखालील ५१ ते ५५ किलो वजनी गटात आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून त्याने विभागीय स्तरावर धडक मारली आहे.

सदर जिल्हास्तरीय स्पर्धा १२ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल) येथे पार पडली. या स्पर्धेत मुशेबने उत्तम तंत्र आणि चपळतेचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.

कोल्हापूर येथे होणार विभागीय स्पर्धा
जिल्हा स्तरावर मिळवलेल्या या यशानंतर मुशेब आता आगामी कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. सदर स्पर्धा १ ते ३ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत रेणुका हॉल (वाठार तळसंदे रोड, तळसंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे संपन्न होणार आहे.

सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव
मुशेब पटेल याने मिळविलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. उमेश गाळवणकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. पल्लवी कामत, ज्येष्ठ क्रीडाशिक्षक श्री. रोहिदास राणे, शालेय व्यवस्थापन समिती तसेच शिक्षक-पालक संघाच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत त्याचे अभिनंदन केले आणि पुढील विभागीय स्पर्धेतील कामगिरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.