LIVE UPDATES

New mobile recharge plans : मोबाईल रिचार्जचे नवे नियम काय? ग्राहकांनो वाचा सविस्तर

TRAI new recharge rules : ज्या ग्राहकांना मोबाइल डेटाची गरज नाही, त्यांना अधिक पर्याय उपलब्ध करून देणे हा यामागचा सरकारचा उद्देश आहे. या नवीन नियमांमुळे जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 30, 2026 13:02 PM
views 69  views
TRAI New Recharge Rules Jio, Airtel and Vi Users to Get More Recharge Options

नवी दिल्ली : मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने मोबाइल रिचार्जबाबत एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. 'टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने (TRAI) प्रीपेड युजर्ससाठी नवीन नियम लागू केले आहेत. या निर्णयाचा फायदा कॉल्स आणि एसएमएससाठी फक्त फोनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.

ज्या ग्राहकांना मोबाइल डेटाची गरज नाही, त्यांना अधिक पर्याय उपलब्ध करून देणे हा यामागचा सरकारचा उद्देश आहे. या नवीन नियमांमुळे जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

अनेक कंपन्यांचे महिन्याचे रिचार्ज प्लॅन्स २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येत असत. त्यामुळे ग्राहकांना वर्षातून साधारणपणे १३ वेळा रिचार्ज करावे लागत असे. ट्रायच्या नवीन नियमांमुळे आता ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रिचार्जचा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे ग्राहकांना पूर्ण महिन्याची वैधता मिळेल.

नवीन नियमांनुसार, जर एखादी टेलिकॉम कंपनी ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा असा प्लॅन देत असेल ज्यामध्ये कॉलिंग, एसएमएस आणि डेटाचा समावेश आहे, तर त्यांना त्याच कालावधीसाठी फक्त व्हॉइस आणि एसएमएस असे पर्यायही देणे बंधनकारक असेल. या प्लॅन्समध्ये मोबाइल डेटाचा समावेश नसेल आणि त्यांची किंमत संबंधित 'बंडल्ड' प्लॅनपेक्षा कमी असावी लागेल.

या निर्णयाचा विशेषतः अशा ग्राहकांना फायदा होईल जे प्रामुख्याने कॉल्स आणि एसएमएससाठी फोनचा वापर करतात. तसेच, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना मासिक आधारावर डेटाची गरज नाही, अशा ग्राहकांसाठीही हा एक उपयुक्त पर्याय ठरेल.