LIVE UPDATES

लोकसहभागातून जलसंधारण ,पाणी बचतीची कामे हाती घ्यावीत

पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी वेधले नगराध्यक्षांचे लक्ष
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 01, 2026 11:42 AM
views 44  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून जलसंधारण व पाणी बचतीची कामे हाती घेण्यासंदर्भात नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचे पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी लक्ष वेधले.

यात म्हटले आहे की, पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनास साथ देऊन शहरात आगामी काळातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जलसंधारण, पाणी बचत करणे, पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असून त्यासाठी लोकसहभागातून स्थानिक पातळीवर मनुष्यबळ सामाजिक संस्था, युवक मंडळे व साधनसामग्रीचा वापर करून शहरातील नरेंद्र डोंगर परिसरातील वनराईमध्ये वहात्या पाण्यावर बंधारे घालावेत. जेणेकरून परतीच्या पावसाचे पाणी अडवून भुजलपातळी वाढवण्यासाठी मदत होईल. 

पाणी बचतीला प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती मोहीत हाती घ्यावी. शहरातील वेशीवरून वाहणाऱ्या छोट्या नद्यांवर बांध घालून पाणी अडवावे. उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करून त्यानुसार पाणी पुरवठा करण्याचे वेळापत्रक जाहीर करावे. सार्वजनिक विहीरी दुरुस्ती करून त्या नागरीकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध ठेवाव्यात. शहरात तातडीने पाण्यासाठी नगरपरिषदेला टँकर उपलब्ध करावा. सध्याची परिस्थिती लक्षात घेता उपाययोजना तातडीने हाती घ्यावी अशी मागणी श्री. बांदेकर यांनी केलीय.