
Hero Destini 110 Classic Edition : हिरो मोटोकॉर्पने आपल्या 'डेस्टिनी ११०' (Destini 110) स्कूटर कॅटेगरीमध्ये एक नवीन 'क्लासिक एडिशन' (Classic Edition) लॉन्च केली आहे. याची एक्स-शोरूम किंमत ७६,४०० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हे नवीन एडिशन आता हिरो मोटोकॉर्पच्या सर्व डीलरशिपवर उपलब्ध झाले आहे.
डेस्टिनी ११०'च्या क्लासिक एडिशन' ही फॅमिली ओरिएंटेड स्कूटर असून तिला 'निओ-रेट्रो' लूक देण्यात आला आहे. यात दोन नवीन कलरचे पर्याय, स्ट्रीप डिटेल्स आणि एक खास 'क्लासिक एडिशन' एम्ब्लेमचा समावेश आहे. एंट्री-लेव्हल 'VX' मॉडेलची किंमत ७५,००० रुपये आहे. याच्या तुलनेत क्लासिक एडिशनची किंमत १,४०० रुपयांनी जास्त आहे. तर टॉप-एंड 'ZX' मॉडेलची किंमत ८३,८०० रुपयांच्या तुलनेत ७,४०० रुपयांनी स्वस्त आहे.
डेस्टिनी ११० क्लासिक एडिशनची डिझाइन
'क्लासिक एडिशन'मध्ये 'मॅट गोल्डफिश सिल्व्हर/लाइट इंडस्ट्रियल ग्रे' आणि 'मॅट एरीज ब्राऊन' या दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्कूटरच्या एकूण लूकला अधिक आकर्षक बनविण्यासाठी डिझाइनमध्ये फ्रंट हँडल कव्हर आणि साइड पॅनेलवर स्पेशल स्ट्रीप्स, स्कूटरच्या कलरशी जुळणारे आरसे, सीट आणि इंटिरिअर पॅनेलचीही उत्तम मांडणी करण्यात आली आहे. यात ब्रँडेड रिम टेप्स आणि ३डी 'क्लासिक एडिशन' एम्ब्लेम देण्यात आला आहे.
डेस्टिनी ११० क्लासिक एडिशनचे इंजिन
'क्लासिक एडिशन'मध्ये स्टँडर्ड डेस्टिनी ११० प्रमाणेच ११०.९ सीसीचे, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७,२५० आरपीएमवर ८.१५ पीएस पॉवर आणि ५,७५० आरपीएमवर ८.७ एनएम टॉर्क जनरेट करते. यात ऑटोमॅटिक सीव्हीटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तसेच, यात हिरोची 'i3S' (आयडल स्टॉप-स्टार्ट) टेक्नलॉजी देण्यात आली आहे. ही टेक्नलॉजी ट्राफिकमध्ये तसेच स्कूटरच्या वापरादरम्यान फ्यूल इफिशिअन्सी सुधारण्यास मदत करते.
डेस्टिनी ११० क्लासिक एडिशनचे फिचर्स
डेस्टिनी ११० च्या या 'क्लासिक एडिशन'मध्ये ७८५ मिमी लांबीची सीट देण्यात आली आहे. हिरो कंपनीच्या दाव्यानुसार या सेगमेंटमधील सर्वात लांब सीट या स्कूटरमध्ये देण्यात आली आहे. यामुळे पाय ठेवण्यासाठी पुरेशी जागा मिळते. यात दोन्ही चाकांसाठी १२ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर फॅमिली ओरिएंटेड स्कूटर असून यात सामान ठेवण्यासाठी १९ लिटरची जागा आणि समोरच्या बाजूला अतिरिक्त स्टोरेज स्पेस दिली आहे. समोरील स्पेसमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधाही उपलब्ध आहे. काळोखात डीकीमध्ये ठेवलेल्या वस्तू सहज शोधता याव्यात यासाठी तिथे एक 'बूट लॅम्प' देण्यात आला आहे.
इतर फिचर्समध्ये डिजिटल-ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि पोझिशन लॅम्प्सचा समावेश आहे. तसेच लूक अधिक आकर्षक बनविण्यासाठी क्रोम फिनिशिंग देण्यात आले आहे. ब्रेकिंगसाठी या स्कूटरमध्ये दोन्ही चाकांवर 'कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टम'सह ड्रम ब्रेक्स दिले आहेत. केवळ टॉप-स्पेक 'ZX' व्हेरिएंटमध्ये पुढच्या चाकावर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या स्कूटरच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला सिंगल शॉक ॲब्सॉर्बर देण्यात आले आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








