
दोडामार्ग : एकीकडे राज्यात दुष्काळ, पाऊस नसल्याने शेतकरी तसेच सर्वसामान्य जनता त्रस्त असताना रेशनकार्ड धारकांच्या उत्पन्नाची अट घालून 52 हजार रेशन धारकांचे धान्य बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबत दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती गणेश प्रसाद गवस यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून या संदर्भात आपण आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले कि एकीकडे दुष्काळाची परिस्थिती असताना सरकारकडून चुकीचे निर्णय घेऊन सर्व सामान्य ग्रामीण भागातील जनतेचे धान्य बंद करणार असून सरकार जनतेवर अन्याय करत आहे. हा अन्याय सरकारने थांबवावा व दुष्काळ काळात सर्व सामान्य जनतेला पूर्ववत धान्य वितरीत करावे या मागणीसाठी सरकार दरबारी आवाज उठवणार आहे.
सरकारकडून उत्पन्नाची अट 45000 हजार ठेवली असून हा जनतेवर अन्याय आहे. एक कुटुंब वर्षभर कसे जगू शकते, एकतर बेकारी वाढली आहे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यात आता सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे गवस म्हणाले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








