
राजापूर : कोकणचा हापूस आंबा म्हणजे जगभरातील आंबाप्रेमींचे आकर्षण. यंदाच्या आंबा हंगामाची चाहूल लागताच राजापूर तालुक्यातील कुवेशी-तुळसुंदे येथील आंबा बागायतदार तानाजी तांबे यांच्या बागेतील रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली हापूस आंबापेटी नवी मुंबईतील वाशी येथील घाऊक फळ बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे आंबा हंगामाच्या सुरुवातीलाच राजापूरच्या हापूसने बाजारपेठेत लक्ष वेधले आहे.
तानाजी तांबे यांनी आपल्या बागेतील हापूस आंब्यांची पहिली सहा डझनांची पेटी वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवली आहे. या पेटीसाठी त्यांना सुमारे ५१ हजार रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच हापूस आंब्याला मिळणारा हा अपेक्षित दर कोकणातील आंबा बागायतदारांसाठी उत्साहवर्धक मानला जात आहे.
राजापूर तालुक्यातील कुवेशी-तुळसुंदे परिसरातील तानाजी तांबे यांनी आपल्या बागेत घेतलेल्या हापूस उत्पादनातून हा मान मिळवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली हापूस आंबापेटी वाशी बाजारपेठेत दाखल झाल्याने राजापूरच्या आंबा बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, यंदाचा आंबा हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








