LIVE UPDATES

घोटगेत 20 नोव्हेंबर रोजी भजन स्पर्धा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 03, 2026 03:40 PM
views 15  views

दोडामार्ग : दरवर्षी प्रमाणे यंदाही घोटगे येथे वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह निमित्त 20 नोव्हेंबर 2026 रोजी खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. घोटगेत श्री देवी सातेरी मंदिरात सलग 21 वर्षे हरीनाम सप्ताहा निमित्त भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 22 व्या वर्षीही भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 10,000 रुपये ठेवण्यात आले असून शिक्षक बळीराम दत्ताराम दळवी यांनी पुरस्कृत केले आहे. द्वितीय क्रमांक 7 हजार रुपये सहदेव नारायण दळवी यांनी पुरस्कृत केले आहे. तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 5 हजार रुपये आबा भिवा दळवी यांच्याकडून ठेवण्यात आले आहे. 

उत्तेजनार्थ बक्षीस 3 हजार रुपये राजेश आबा दळवी यांच्याकडून पुरस्कृत आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे खालील प्रमाणे उत्कृष्ट गायक 1500 रू श्रीराम बाळकृष्ण दळवी तसेच उत्कृष्ट हार्मोनियम 1500 रु प्रसाद आबा दळवी तर उत्कृष्ट तबलावादक 1500 रुपये रवींद्र बळीराम दळवी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी लागणारा अल्पोपहार शिक्षक सुधीर आबा दळवी याचकडून देण्यात येणार आहे. 

20 नोव्हेंबर 2026 रोजी होणाऱ्या खुल्या भजन स्पर्धेच्या स्वरूपामध्ये सुरुवात जय जय राम कृष्ण हरी, रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग, नामाचा अभंग, शेवटी गौळण दोन तसेच संपूर्ण भजनाचा कालावधी 45 मिनिटे ठेवण्यात आलेला आहे. भजन स्पर्धेसाठी इच्छुक भजन मंडळानी आपली नावे नोंद करावी. संदीप भिकाजी दळवी - 9421265242 , जनार्दन गणेश सुतार - 9420265229 , अजित जगन्नाथ दळवी - 9421265242 यांच्याशी संपर्क साधावा.


ताजी बातमी

View all

 Indian-flagged cargo ship MSV Al-Yusufi attacked near Oman coast, leaving one Indian sailor dead.
Indian Ship Attacked : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला, भारतीय खलाशाचा मृत्यू तर १३ जणांची सुटका
November 03, 2026
४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार
November 03, 2026
Political controversy over Pinguli Pazar Lake conservation and development in Kudal, Sindhudurg.
Pinguli Pazar Lake : “आमदारांच्या दोन बैठकांना गैरहजर, आता उपोषणाचा फार्स कशासाठी?”
November 03, 2026
Mangaon Valley farmers in Sindhudurg awaiting ownership rights for Akaripad lands following High Court order.
Sindhudurg Akaripad Land Issue : आकारीपडच्या १,४४४ शेतकऱ्यांना दिलासा
November 03, 2026
संबंधित बातम्या

View all

४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार
November 03, 2026
Political controversy over Pinguli Pazar Lake conservation and development in Kudal, Sindhudurg.
Pinguli Pazar Lake : “आमदारांच्या दोन बैठकांना गैरहजर, आता उपोषणाचा फार्स कशासाठी?”
November 03, 2026
Mangaon Valley farmers in Sindhudurg awaiting ownership rights for Akaripad lands following High Court order.
Sindhudurg Akaripad Land Issue : आकारीपडच्या १,४४४ शेतकऱ्यांना दिलासा
November 03, 2026
दुष्काळग्रस्त राजापूर तालुक्यात जलसंधारणासाठी पोलिसांचे श्रमदान
November 03, 2026