
मुंबई : तुम्ही जर बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर बोल्ट इव्हिओ फोन चांगला पर्याय ठरु शकतो. बोल्ट इव्हिओ स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा एआय मेन कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी कॅमेऱ्यामध्ये 'रिअल टोन' सह एआय पोर्ट्रेट मोड, एआय नाईट मोड आणि एआय सेल्फी एन्हांसमेंट यांसारखे फिचर्स आहेत. तसेच, या फोनमध्ये ६०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
बोल्ट इव्हिओचे महत्वाचे फिचर्स
बोल्ट इव्हिओमध्ये ६.७९ इंचाच्या डिस्प्लेला १२०Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. बोल्ट इव्हिओमध्ये ६०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात UNISOC T7250 ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये 4 जीबी रॅम मिळते, तर टॉप व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमची सुविधा आहे.
बोल्ट इव्हिओच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा एआय कॅमेरा आणि त्यासोबत 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या कॅमेरामध्ये एआय पोर्ट्रेट मोड आणि एआय नाईट मोडसह अनेक एआय आधारित फिचर्सचा समावेश केला आहे. पोर्ट्रेट मोडमुळे विशिष्ट बॅकग्राउंड इफेक्ट असलेले फोटो काढता येतात, तर नाईट मोड कमी प्रकाशातही फोटोची क्विलिटी सुधारतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये 'रिअल टोन' या फिचरचा देखील समावेश आहे.
दरम्यान, तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरील अर्ली बर्ड सेलमध्ये ८,९९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकता. फ्लिपकार्टवरील हा अर्ली बर्ड सेल २४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सुरू होईल. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेले बेस मॉडेल अर्ली बर्ड सेलमध्ये ८,९९९ रुपयांना उपलब्ध असेल तर सध्या फ्लिपकार्टवर याची किंमत १०,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम असलेले मॉडेल सध्या फ्लिपकार्टवर १२,४९९ रुपयांना लिस्ट आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










