
नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी रेडमीने भारतात आपले दोन दमदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये रेडमी नोट 17 प्रो आणि रेडमी नोट 17 प्रो मॅक्स लॉन्च केले आहेत. यामध्ये अनुक्रमे दमदार अशी 9 हजार एमएएच आणि 10 हजार एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तसेच दोन्ही मॉडेल्समध्ये 6.83 इंचाचा 1.5 के एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
डिस्प्ले
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.83 इंचाचा 1.5 के एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 120 हर्टझ रिफ्रेश रेट, 3,500 निट्सपर्यंतची पीक ब्राइटनेसचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 12 बिट कलर डेप्थ देतो. यामध्ये एचडीआर 10 प्लस तसेच डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
कॅमेरा
दोन्ही मॉडेल्समध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेऱ्याचा समावेश आहे. प्रो मॅक्सच्या 50 मेगापिक्सल मेन कॅमेरामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि एआय फिचर्सचा सपोर्ट मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी दोन्ही फोन्समध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
इतर फिचर्स
रेडमी नोट 17 प्रो आणि प्रो मॅक्स हे वेगवेगळ्या चिपसेट्सवर रन करतात. नोट 17 प्रोमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे, तर नोट 17 प्रो मॅक्स मध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 5 चिपसेटसह लॉन्च करण्यात आले आहे. रेडमी नोट 17 प्रो गुलाबी रंगात लॉन्च करण्यात आला आहे, तर रेडमी नोट 17 प्रो मॅक्स 'सिक्रेट सनशाईन' या कलरमध्ये उपलब्ध आहे.
सॉफ्टवेअरच्या बाबतीत दोन्ही स्मार्टफोन्स एन्ड्रॉईड 16 वर आधारित शाओमी हायपर ओएस 3 सह येतात. कंपनीने चार वर्षांचे ओएस अपग्रेड्स आणि सहा वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे. तसेच दोन्ही फोन्सना आयपी 66, आयपी 68, आयपी 69 आणि आयपी 69 के रेटिंग्स मिळाले आहेत. हे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देतात.
बॅटरी
रेडमी नोट 17 प्रो मध्ये 9,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीला 67 वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. तर प्रो मॅक्समध्ये 10,000 एमएएचच्या सिलिकॉन कार्बन बॅटरीसह 100 वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
किंमत
भारतात रेडमी नोट 17 प्रोच्या बेस व्हेरिएंटची (8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज) किंमत 36,999 रुपयांपासून सुरू होते. तसेच, 8 जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज असलेल्या हायर-एंड व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे.
रेडमी नोट 17 प्रो मॅक्सच्या बेस 8 जीबी + 256 जीबी मॉडेलची किंमत 49,999 रुपयांपासून सुरू होते, तर टॉप एंड 12 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 55,999 रुपये आहे. रेडमी नोट 17 प्रोची पहिली विक्री 17 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर रेडमी नोट 17 प्रो मॅक्सची विक्री 23 सप्टेंबरपासून सुरू होईल.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










