LIVE UPDATES

तुमच्या नावावरचा SIM दुसऱ्याला देऊ नका

होऊ शकतो तुरुंगवास आणि लाखोंचा दंड
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 23, 2026 12:54 PM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

नवी दिल्ली : तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेले सिमकार्ड मित्राला, नातेवाईकाला देणे किंवा विकणे तुम्हाला भलतेच महागात पडू शकते. तुम्ही दिलेले सिमकार्ड जर एखाद्या बेकायदेशीर कृत्यासाठी किंवा सायबर गुन्ह्यासाठी वापरले गेले, तर त्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी मूळ मालकावर येईल, असा स्पष्ट इशारा दूरसंचार विभागाने (DoT) दिला आहे.

दूरसंचार अधिनियम, २०२३ अंतर्गत याप्रकरणी कडक कारवाईची तरतूद करण्यात आली असून दोषी आढळल्यास ३ वर्षांपर्यंतचा कारावास आणि तब्बल ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

नेमका प्रकार काय?

मध्य प्रदेश परवाना सेवा क्षेत्रात (LSA) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तेथील एका पॉइंट ऑफ‌ सेल (PoS) एजंटने नागरिकांना नकळत, त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून तब्बल २५ बनावट सिमकार्ड जारी केली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर दूरसंचार विभागाने संबंधित एजंटला तात्काळ ब्लॅकलिस्ट (काळ्या यादीत) टाकले असून ते २५ कनेक्शन खंडित केले आहेत.