LIVE UPDATES

Crime News : रुग्णालयातून फूस लावून तरुणीचे अपहरण करून बलात्कार

Bihar rape case : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका हॉस्पिटलमधून आरोपीने १९ सप्टेंबर रोजी तरुणीचे अपहरण करीत मोतिहारी येथे नेले. मोतिहारी येथील छत्राउनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भाड्याच्या खोलीत त्याने तिला डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 23, 2026 18:47 PM
views 29  views

नवी दिल्ली : बिहारच्या जमुई जिल्ह्यात एका विद्यार्थिनीवर भररस्त्यात झालेल्या अमानुष कृत्याची घटना ताजी असतानाच एका तरुणीवर बलात्कार झाल्याची आणखी एक घटना बिहारमधून समोर आली आहे. एका तरुणाने मुझफ्फरपूर येथील एका हॉस्पिटलमधून तरुणीचे अपहरण करीत बलात्कार केला.

याबाबत वृत्तसंस्थांमध्ये प्रसिध्द झालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका हॉस्पिटलमधून आरोपीने १९ सप्टेंबर रोजी तरुणीचे अपहरण करीत मोतिहारी येथे नेले. मोतिहारी येथील छत्राउनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भाड्याच्या खोलीत त्याने तिला डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. तरुणीच्या वडिलांनी मुझफ्फरपूर पोलिसांत वडिलांनी २० सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली. 

याबाबतची तक्रार दाखल होताच मुझफ्फरपूर पोलिसांनी तपास केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका अज्ञात तरुणाने पीडितेला घेऊन जाताना पोलिसांना दिसले. त्यानंतर, मुझफ्फरपूरच्या एसएसपींच्या सूचनेनुसार एक तपास पथक स्थापन करण्यात आले. गुप्त माहिती आणि तांत्रिक पुराव्यांचा वापर करून पोलीस पथकाने आरोपीची ओळख पटवली. सोमवारी रात्री उशिरा पीडितेची सुटका केली. आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. 

मुझफ्फरपूरचे सिटी एसपी मोहिबुल्ला अन्सारी यांनी मंगळवारी सांगितले की, आरोपी हा क्षयरोग रुग्ण आहे. तो उपचारासाठी मुझफ्फरपूरला आला होता. तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव सोनू सिंग आहे. त्याने पीडितेला आपण तिच्या वडिलांच्या सासरच्या कुटुंबातून आलो आहोत असे सांगून फसवले आणि पैशांचे आमिषही दाखवले. त्यानंतर तो तिला मोतिहारीला घेऊन गेला, जिथे त्याने तिला डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणी सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे.