LIVE UPDATES

Best 5G Smartphones : २० हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये खरेदी करा हे ५ दमदार 5 जी स्मार्टफोन

Best 5G Smartphones Under 20000 : या लिस्टमध्ये रेडमी 15 सी प्राईम एडिशन (Redmi 15C 5G Prime Edition), सॉमसंग गॅलेक्सी एम 17 ई 5 जी (Samsung Galaxy M17e 5G), लावा बोल्ड एन 4 प्रो 5 जी (Lava Bold N4 Pro 5G), वनप्लस एन6 एक्स (OnePlus N6x) आणि मोटोरोला जी 37 पॉवर 5 जी (Motorola G37 Power 5G) यांचा समावेश आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 13, 2026 13:30 PM
views 171  views
Smartphones

नवी दिल्ली : जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल आणि तुमचे बजेट २० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर हे पाच फोन तुमच्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात. 

या फोन्समध्ये मोठी बॅटरी, 5 जी कनेक्टिव्हिटी, ५० मेगापिक्सल पर्यंतचे कॅमेरे आणि स्मूथ डिस्प्ले यांसारखे फिचर्स आहेत. या लिस्टमध्ये रेडमी 15 सी प्राईम एडिशन (Redmi 15C 5G Prime Edition), सॉमसंग गॅलेक्सी एम 17 ई 5 जी (Samsung Galaxy M17e 5G), लावा बोल्ड एन 4 प्रो 5 जी (Lava Bold N4 Pro 5G), वनप्लस एन6 एक्स (OnePlus N6x) आणि मोटोरोला जी 37 पॉवर 5 जी (Motorola G37 Power 5G) यांचा समावेश आहे.

लावा बोल्ड एन4 प्रो 5 जी (Lava Bold N4 Pro 5G) या स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. ज्यांना १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन 5 जी फोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा फोन चांगला पर्याय ठरु शकतो. या फोनच्या महत्वाच्या फिचर्समध्ये ६००० एमएएच बॅटरी, १८ वॅट चार्जिंग आणि ५० मेगापिक्सल एआय रिअर कॅमेरा यांचा समावेश आहे. हा फोन अँड्रॉइड १६ (Android 16) वर रन करतो आणि त्याला आयपी 64 रेटिंग देण्यात आले आहे.

मोटोरोला जी 37 पॉवर 5 जी या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १५ हजार ८०० रुपये आहे. जास्त वेळ फोन वापरणाऱ्यांसाठी यात ७ हजार एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे. यात ६.६६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला १२० हर्टझ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मिडीयाटेक डायमेंसिटी 6400 (MediaTek Dimensity 6400) ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालणारा हा फोन नेहमीची कामे आणि 5 जी कनेक्टिव्हिटीसाठी डिझाइन केला गेला आहे. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सल एआय रिअर कॅमेरा आणि सेल्फी व व्हिडिओ कॉल्ससाठी ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, हा फोन एमटीएल-एसटीडी-810 एच मिलिटरी-ग्रेड बॉडी देण्यात आली आहे.

रेडमी 15 सी 5 जी प्राईम एडिशन (Redmi 15C 5G Prime Edition) च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. यात ६,००० एमएएचची बॅटरी आणि १२० हर्टझ पर्यंतचा रिफ्रेश रेट असलेला ६.९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मिडियाटेक डायमेंसिटी 6300 प्रोसेसरवर रन करतो. तसेच यात ५० मेगापिक्सल एआय ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप तसेच ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम 17 ई 5 जी या फोनच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६ हजार ९९८ रुपये आहे. (Samsung Galaxy M17e 5G) मध्ये ६,००० एमएएच बॅटरी, १२० हर्टझ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा आहे. तसेच या फोनमध्ये आयपी 54 रेटिंग देण्यात आले आहे. या प्रोटेक्शनमुळे धूळ आणि पाण्याच्या थेंबांपासून फोनला संरक्षण मिळते. कंपनीने नॉक्स ​प्रोटेक्शन आणि सहा वर्ष ओएस अपग्रेड्स कंपनीतर्फे देण्यात येणार आहेत.

वनप्लस एन6 एक्स (OnePlus N6x) हा या लिस्टमधील सर्वात महागड्या पर्यायांपैकी एक आहे. या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात असलेली ७००० एमएएचची बॅटरी. या फोनमध्ये १२० हर्टझ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि मोठी कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हे फिचर्स विशेषतः गेमर्स आणि फोनचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात. तसेच, याची बॉडी 'मिलिटरी-ग्रेड' दर्जाची आहे.