LIVE UPDATES

Best Cars Under 11 Lakh : दिवाळीत ११ लाखांपेक्षा कमी किमतीत घरी आणा 'हे' जबरदस्त फिचर्स असलेली कार

Buying a Car This Diwali : सर्व गाड्यांची किंमत ११ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये निसान मॅग्नाइट, मारुती डिझायर, रेनॉल्ट कायगर, टाटा टियागो या कार्सचा समावेश आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 12, 2026 16:49 PM
views 134  views

नवी दिल्ली : तुम्ही या दिवाळीत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला जबरदस्त फिचर्सवाली कार कमी किंमतीत खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आम्ही चार सर्वात चांगले पर्याय दिले आहेत. या सर्व गाड्यांची किंमत ११ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये निसान मॅग्नाइट, मारुती डिझायर, रेनॉल्ट कायगर, टाटा टियागो या कार्सचा समावेश आहे.

निसान मॅग्नाइट (Nissan Magnite)

निसान मॅग्नाइट ही भारतातील बजेटमधील सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीपैकी (SUVs) एक आहे. याचा ३६० डिग्री कॅमेरा 'टेक्ना' (Tekna) आणि 'टेक्ना प्लस' (Tekna Plus) या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. याची किंमत साधारणपणे ८.४३ लाख ते १०.९९ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यात 'ब्लाईंड-स्पॉट मॉनिटर' किंवा '३डी व्ह्यू मोड' नसला तरी ही सिस्टिम तुम्हाला विविध कॅमेरा अँगल निवडण्याची सुविधा देते.

नॉर्मल लाईटमध्ये क्वालिटी चांगली आहे. मात्र कमी लाईटमध्ये इमेज थोड्या 'ग्रेनी' दिसू शकतात. मॅग्नाइटमध्ये ८ इंचाची टचस्क्रीन, ७ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मागील एसी व्हेंट्ससह ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि ६ स्पीकरची 'अर्कामिस' साऊंड सिस्टम देण्यात आली आहे.

मारुती डिझायर (Maruti Dzire)

'सेडान' प्रकारातील मारुती डिझायर ही या कॅटेगरीमधील एकमेव कार आहे. तिच्या 'झेडएक्सआय प्लस' (ZXi Plus) व्हेरिएंटमध्ये ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे आणि त्याची किंमत साधारणपणे ८.९६ लाख ते ९.५४ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही सिस्टिम २डी आणि ३डी अशा दोन्ही प्रकारची व्ह्यूज देते. यामध्ये इमेजची क्वालिटी चांगली आहे. यात 'ब्लाईंड-स्पॉट मॉनिटर'चा समावेश नाही. डिझायरमध्ये ९ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, वायरलेस फोन चार्जर आणि सिंगल पेन सनरूफ यांसारखी फिचर्सही मिळतात.

रेनॉल्ट कायगर (Renault Kiger)

रेनॉल्ट कायगर आणि निसान मॅग्नाइट या एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. कायगरच्या टॉप-स्पेक 'इमोशन' (Emotion) व्हेरिएंटमध्ये ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत साधारणपणे ८.५० लाख ते १०.४० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. 

मॅग्नाइटप्रमाणेच, यात ३डी व्ह्यू किंवा ब्लाइंड स्पॉट मॉनिटरची सुविधा देण्यात आलेली नाही. कायगरमध्ये ८ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, ७ इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यासारखे फिचर्स मिळतात.

टाटा टियागो (TATA Tiago)

टाटा टियागो ही देशातील लोकप्रिय हॅचबॅक कारपैकी एक आहे. तिच्या 'क्रिएटिव्ह' आणि 'क्रिएटिव्ह प्लस' व्हेरिएंट्समध्ये ३६० डिग्री कॅमेरा मिळतो. या व्हेरिएंट्सची किंमत साधारणपणे ७.०६ लाख ते ८.६२ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

यामध्ये कॅमेरा स्पष्ट व्ह्यू देतो. यात 'ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटर'चाही समावेश आहे. जो इंडिकेटर चालू करताच सुरु होतो. तसेच जेव्हा मॉनिटर सुरु असतो तेव्हा कॅमेराचे फूटेज संपूर्ण टचस्क्रीन डिस्प्लेवर असते. यामुळे मॅप पाहणे कठीण होऊ शकते. गरज नसताना हे फिचर बंद करता येते. टियागोमध्ये १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, मागील ए/सी (AC) वेंट्ससह ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जर यांसारखी फिचर्सही उपलब्ध आहेत.