LIVE UPDATES

सावंतवाडीत भरवस्तीत दिसला बिबट्या

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 08, 2026 10:47 AM
views 131  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : शहरात खासकीलवाडा परिसरात भरवस्तीत बिबट्या दाखल झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. काहीजणांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले. 

 रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शहरात बिबट्या असून रात्री खासकीलवाडा भागात तो दिसून आला. राजवाड्याच्या मागील बाजूस असलेल्या झाडीतून त्याने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

दरम्यान, रात्री घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल झाली होती .त्या  बिबट्याचा शोध घेण्यात येत असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे वनरक्षक कोलगाव अक्षय कुंभार, माजगावचे सुनील चोथे, मळगावचे सुनिल गडदे, आरारटी शुभम फाटक, तुषार सावंत आदींसह वनविभागाची टीम उपस्थित होती.