LIVE UPDATES

नानांच्या निधनाची वार्ता मनाला वेदना देणारी

आमदार केसरकरांनी वाहिली श्रद्धांजली
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 08, 2026 15:33 PM
views 76  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : एक संवेदनशील, महान अभिनेते, तितकेच चांगले समाजकारणी, निर्भीड व्यक्तिमत्त्व असलेले नाना पाटेकर यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दु:खद आणि मनाला वेदना देऊन जाणारी आहे. सुमारे पाच दशकांहून अधिक आपल्या अष्टपैलू अभिनयाने महाराष्ट्रातीलच नव्हे, जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या नानांनी नाट्य-चित्रपटसृष्टी गाजवली. 

अभिनय क्षेत्रात कारकिर्द करताना त्यांच्यातील संवेदनशील माणूस सदैव सजग होता हे नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामातून दिसून आले. अशा शब्दात आमदार दीपक केसरकर यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली .