LIVE UPDATES

कातवण येथे ११ पासून सार्वजनिक नवरात्र उत्सव

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 08, 2026 17:36 PM
views 19  views

देवगड : कातवण येथील तरुण उत्साही ग्रामस्थ मंडळाच्यावतीने ११ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मूर्ती प्रतिष्ठापना, आरती, तिर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता पालखी परिव मा. १२ रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीर, सायंकाळी ५ वाजता पालखी परिक्रमा, रात्री १० वाजता महालक्ष्मी वारकरी दिंडी भजन, इळये सडा यांचा कार्यक्रम. १३ रोजी रात्री १० वाजता बाबा मेस्त्री मांड- नेरुर कुडाळ यांचा 'शिमगोत्सव रोंबाट' कार्यक्रम. १४ रोजी रात्री १० वाजता समर्थ दांडिया ग्रुप, कुणकेश्वर यांचा कार्यव म. १५ रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, रात्री १० वाजता महिला फुगडी जुगलबंदी होणार असून स्वयंभू फुगडी मंडळ, बांधकरवाडी- कणकवली व महादेश्वर फुगडी मंडळ, नाडण-देवगड हे सहभागी होणार आहेत.

१६ रोजी रात्री १० वाजता बुवा लवू चव्हाण (कुणकेश्वर) व बुवा योगेश पाडावे (किंजवडे) यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. १७ रोजी रात्री १० वाजता दुर्गाई फुगडी मंडळ, कातवण यांचा कार्यक्रम. १८ रोजी रात्री १० वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम (स्थानिक महिलांसाठी). १९ रोजी रात्री ९ वाजता स्थानिक दांडिया नृत्य.

२० रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद व आरती, रात्री १० वाजता सांस्कृतिक कलामंच- कोल्हापूर यांचा नव्या जुन्या हिंदी, मराठी गीतांचा रिमिक्स चॅलेजिंग व्हरायटी शो ऑर्केस्ट्रा 'तुफान'. २१ रोजी दुपारी ३.३० वाजता आरती, सायंकाळी ४ वाजता अंबेमातेचा ढोलपथकाच्या गजरात भव्य मिरवणुकीने विसर्जन सोहळा रंगणार आहे.

नवरात्र उत्सव कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री ८ वाजता स्थानिक भजने, रात्री ९ वाजता स्थानिक दांडिया नृत्य असे कार्यक्रम होणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तरुण उत्साही ग्रामस्थ मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.