
नवी दिल्ली : फ्लिपकार्ट 'बिग बिलियन डेज' आणि ॲमेझॉन 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६' सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त डील्स उपलब्ध झाल्या आहेत. बजेटपासून ते प्रीमियम फ्लॅगशिप कॅटेगरीपर्यंत मिळणाऱ्या डिस्काऊंटमुळे अनेक स्मार्टफोन्स कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.
यामध्ये मोटोरोला (Motorola), रिअलमी (Realme), नथिंग (Nothing), विवो (Vivo), ॲपल (Apple) आणि सॅमसंग (Samsung) यांसारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
मोटोरोला एक्स 70 प्रो (Motorola X70 Pro)
सुमारे ३७ हजार रुपयांच्या किमतीसह सर्वात दमदार 'ऑल-राऊंडर' डील्सपैकी एक आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ८५०० एक्सट्रीम (MediaTek Dimensity 8500 Extreme) प्रोसेसरवर चालतो आणि यात एलपीडीडीआर5एक्स रॅम (LPDDR5X RAM) व यूएफएस 4.1 (UFS 4.1) स्टोरेजची सुविधा आहे. तसेच, यात ६,५०० एमएएचची मोठी बॅटरी आणि ९० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
रिअलमी पी 4 पॉवर (Realme P4 Power)
रिअलमी पी 4 पॉवर फोन २९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. हा फोन १०,००० एमएएच बॅटरी आणि ८० वॅट चार्जिंग सपोर्टसह येतो. यात २७ वॅटची रिव्हर्स वायर्ड चार्जिंगची सुविधाही मिळते. या डिव्हाइसमध्ये ६.८ इंचाचा 1.5 के 144 हर्ट्झ एमोलेड डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेन्सिटी ७४०० अल्ट्रा (MediaTek Dimensity 7400 Ultra) प्रोसेसरसह यूएफएस 3.1 स्टोरेज देण्यात आला आहे. याच्या कॅमेरा सेटअपमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. तर १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
नथिंग फोन 4 (Nothing Phone 4)
8जीबी+128 जीबी व्हेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 7एस जेन 4 (Snapdragon 7s Gen 4) प्रोसेसर, यूएफएस 3.1 स्टोरेज आणि 1.5 के 120 हर्टझ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ५,४०० एमएएच बॅटरी आणि ५० वॅट चार्जिंगचा सपोर्टही देण्यात आला आहे.
मोटोरोला सिग्नेचर (Motorola Signature)
५७,९९९ रुपयांच्या किमतीत 'Motorola Signature' हा फोन ग्राहक खरेदी करु शकातात. हा फोन Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसरवर चालतो आणि यात 12GB LPDDR5X रॅम (RAM) व UFS 4.1 स्टोरेज देण्यात आले आहे. यात 165Hz LTPO AMOLED डिस्प्ले आणि 5,120mAh ची बॅटरी आहे; तसेच हा फोन 90W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. याच्या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP ची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MP चा 3x पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा यांचा समावेश आहे.
व्हिवो एक्स200 टी (Vivo X200T)
६० हजार रुपयांच्या किंमतीच्या कॅटेगरीतील आणखी एक दमदार स्पर्धक म्हणजे 'Vivo X200T'. यात मिडीयाटेक डायमेंसिटी 9400 प्लस प्रोसेसर, 12 जीबी LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनमध्ये 6,200mAh ची बॅटरी असून तो 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. याच्या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP ची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MP चा 3x पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा यांचा समावेश आहे.
आयफोन 17 (iPhone 17)
सणासुदीच्या सेलदरम्यान Apple iPhone 17 ची किंमत ८० हजार रुपये असेल असे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही किंमत त्याच्या मूळ लॉन्च किंमतीपेक्षा बरीच कमी आहे. आयफोन 17 (iPhone 17) मध्ये 120 हर्ट्झ प्रोमोशन डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचा पीक ब्राइटनेस (peak brightness) 3,000 निट्सपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस25 अल्ट्रा (Samsung Galaxy S25 Ultra)
प्रीमियम कॅटेगरीमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा (Samsung Galaxy S25 Ultra) फोन अंदाजे ९६ हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करु शकतात. या किंमतीत हा फोन एक हाय एंड फ्लॅगशिप अनुभव देतो. या फोनमध्ये ६.९ इंचाचा क्यूएचडी प्लस १२० हर्टझ एमोलेड डिस्प्ले, 'स्नॅपड्रॅगन ८ एलिट फॉर गॅलेक्सी' (Snapdragon 8 Elite for Galaxy) प्रोसेसर आणि इन बिल्ट एस पेन देण्यात आले आहे.













