तुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप | पाचजण जागीच ठार

लातूर - उदगीर रस्त्यावर हैबतपूर पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 04, 2022 16:36 PM
views 677  views

लातूर : लातूर - उदगीर रस्त्यावर हैबतपूर पेट्रोल पंपाजवळ कार व एसटी महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. अपघातात कारमधील पाचजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

उदगीर येथून कुटुंब कारने (एमएच २४ एबी ४०८०) सकाळी ८.३० च्या सुमारास निघाले  होते. कारमधून सहाजण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर- उदगीर रस्त्यावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालवकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन धडकली.

अपघातानंतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख व चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर अशी त्यांची नावे आहेत. तर प्रियांका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहेत.