कुडाळ : वैभव नाईक शिवसेनेत जाणार होता. कुडाळ मालवण मतदारसंघात राणे लढणार नाहीत, हे आधी कन्फर्म होऊ द्या. राणेंना तिकीट देणार नाही, आणि आपलं कुडाळ मालवणमधील तिकीट फायनल होईल, तरच मी शिवसेनेत येणार, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंना भेटून वैभव नाईक यांनी केला होत. हे सत्य आहे. हे जर वैभव नाईक खोटं म्हणत असतील तर त्यांनी कुठच्याही मंदिरात येऊन देवाच्या पाषाणाला हात लावून आपण असं बोललोच नाही, असं सांगावं, असं खुलं आव्हान माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईकांना दिले आहे.
वैभव नाईक हे खोटारडे असून ते केवळ शिवसेनेमध्ये असताना मलई खात आले आहेत. उद्धव ठाकरेंची दिशाभूल करत आले आहे. त्यामुळे चोरून, लपून एकनाथ शिंदेंना भेटणाऱ्या वैभव नाईकाने निष्ठेची भाषा करू नये, अशी जोरदार टीका निलेश राणे यांनी केली आहे.