उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या आदरातिथ्यानं भारावले पालकमंत्री | सामाजिक कार्यातील योगदानाचेही केले तोंडभरून कौतुक !

पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पहिलाच दोडामार्ग तालुका दौरा
Edited by: संदीप देसाई
Published on: November 30, 2022 19:57 PM
views 216  views

दोडामार्ग ; सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच दोडामार्ग तालुका दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच विशेष आदरातिथ्य करण्याची संधी दोडामार्ग शहरातील उद्योजक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांना मिळाली. खास नाईक यांच्या घरी हे आपुलकीचे आदरातिथ्य घेतल्यानंतर उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या निस्वार्थी सामाजिक कार्य व शहारच्या विकासासाठी ते देत असलेल्या योगदानाबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष कौतुक केले. 

  सुशीला हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमासाठी ग्रीन व्हीलेजमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं आगमन होताच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या उपस्थितीत विवेकानंद नाईक यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं नाईक यांनी आपल्या निवासस्थानी आदरातिथ्य केल. यावेळी पालकमंत्री यांचे समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, रमांकात जाधव, रंगनाथ गवस आदि उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी विवेकानंद नाईक यांचं दोडामार्ग शहार विकासासाठी भरीव योगदान असल्याच सांगत त्यांनी शहारासाठी दिलेली मोफत शववाहिका, ग्रामीण रुग्णालायसाठी दिलेला पाण्याचा पंप, अनेक सामाजिक व संस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रम यासाठी गेली ३०-४० वर्षे नाईक यांचं योगदान राहिल्याच आवर्जून सांगितलं. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही नाईक यांचं या योगदांनाबद्दल व नाईक यांनी आपुलकिन केलेल्या आदरातिथ्याच विशेष कौतुक केल.