LIVE UPDATES

मोबाईलपासून स्विमिंगपूलकडे विद्यार्थ्यांची वाटचाल

महेश इंगळे यांच्या स्विमिंगग्रुपच्या वतीने मोफत जलतरण प्रशिक्षण; शेकडो विद्यार्थ्यांना लाभ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 17:48 PM
views 53  views

अक्कलकोट : उन्हाळी सुट्टीत मुलांनी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून आरोग्यदायी व जीवनरक्षक कौशल्ये शिकणे गरजेचे आहे. पोहणे हे प्रत्येक मुलाला आले पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी केवळ मनोरंजन न करता जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करावीत या उद्देशाने स्विमिंग ग्रुपच्या वतीने अनेक विद्यार्थी मुला-मुलींना मोफत जलतरण (स्विमिंग) प्रशिक्षण देण्यात येते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोहण्याचे प्रशिक्षण मिळते. पालक वर्गातून देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. असे प्रतिपादन नगरसेवक महेश इंगळे यांनी केले.

अक्कलकोट येथील स्विमिंग ग्रुपचे संस्थापक नगरसेवक महेश इंगळे यांच्या वतीने आयोजित स्विमिंग प्रशिक्षणाच्या निरोप समारंभ कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.यावेळी अप्पू पराणे, दत्तात्रय कटारे, कुमार हटुरे, रफिक पठाण, देवरमणी, ऑकारेश्वर उटे, पाटील, सिद्धू बिडवे, शंतनू स्वामी, दयानंद दुरणे, डॉ. चिंचोली, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. हिरण्णा पाटील, हनुमंत कोटली आदींसह ग्रामस्थ,पालक व स्विमिंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  यावेळी पुढे बोलताना इंगळे म्हणाले की, गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांना पोहण्याचे प्रशिक्षण घेतात. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक पालक आपल्या मुलांना पोहणे शिकण्यासाठी स्विमिंग ग्रुपकडे पाठवत आहेत.उन्हाळी सुट्टीचा कालावधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी विशेष मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात मुलांना पोहण्याचे प्राथमिक धडे, पाण्यातील सुरक्षिततेचे नियम तसेच आत्मविश्वासाने जलतरण करण्याचे मार्गदर्शन करण्यात येते.आणि शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ घेण्यात येतो.यावर्षी पासून दिवाळी सुट्टीत बरोबर  इतर कालावधीत सुरू ठेवण्यात येईल,” असेही इंगळे यांनी सांगितले.

स्विमिंग ग्रुपचे सहकारी बाबा सुरवसे, श्रीनिवास गुंजे, प्रतीश किलजे, शैलेश राठोड, अभिजित पवार, राहुल स्वामी, महांतोष कोपा, तारापूरे काका, इटकूर आदींनी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही उपस्थित मान्यवरांकडून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलतरणाबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून स्विमिंग ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा दर्शन घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.