LIVE UPDATES

MLA Rohit Pawar : वटवृक्ष स्वामी देवस्थानाला आमदार रोहित पवारांची सदिच्छा भेट

देवस्थानच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे केले विशेष कौतुक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 12, 2026 04:13 PM
views 16  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

देवगड : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाला सदिच्छा भेट देत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेल्या शिस्तबद्ध आणि भाविकाभिमुख व्यवस्थापनाचे त्यांनी विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केले.

देवस्थान समितीचे चेअरमन तथा भाजप नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रथमेश मालक इंगळे यांच्या हस्ते आमदार रोहित पवार यांना श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पालघरचे आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत बाबर यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

सत्कार समारंभात बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, हे केवळ देवस्थान नसून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे महाकेंद्र आहे. येथील स्वच्छता, दर्शनरांग, प्रसाद व्यवस्था तसेच सुरक्षेचे नियोजन कौतुकास्पद आहे. चेअरमन महेश मालक इंगळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे देवस्थानासाठीचे काम इतर देवस्थानांसाठी आदर्शवत आहे. भाविकांना केंद्रबिंदू मानून केलेली सेवा हीच खरी स्वामी सेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सर्वांना निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी श्री स्वामी चरणी प्रार्थनाही केली.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, माजी शहराध्यक्ष सौरभ लांडगे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, तुषार मोरे आदींसह भाविक उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
Training aircraft skids off the runway at Solapur Airport during takeoff, woman trainee pilot safe
Solapur Airport Incident : सोलापूर विमानतळावर विमानाचा थरारक अपघात; उड्डाणादरम्यान प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : विश्वनाथ गिरकर यांचे निधन
November 12, 2026
Naigaon railway station incident where a woman was allegedly pushed from a local train
लोकलमधील छेडछाडीला विरोध केला अन् तरुणीला ट्रेनमधून ढकलले; नायगावच्या घटनेत तरुणीने गमावला हात
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : विश्वनाथ गिरकर यांचे निधन
November 12, 2026
एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sainik School Exam Schedule : सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक एनटीएकडून जाहीर
November 12, 2026