LIVE UPDATES

Devgad News : विश्वनाथ गिरकर यांचे निधन

दानशूर व्यक्तिमत्त्व हरपले ; सामाजिक क्षेत्रातही होते मोलाचे योगदान
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 12, 2026 04:02 PM
views 34  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

देवगड : तालुक्यातील मूळ गाव कुणकेश्वर वाळकेवाडी येथील विश्वनाथ गिरकर सध्या वरेरी येथे वास्तव्यास आलेल्या भारतीय डाक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत असलेले तसेच दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले विश्वनाथ गिरकर (वय ५६) यांचे बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

कोल्हापूर येथील अंतरंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सकाळी १०.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकालीन यकृत निकामी होण्याच्या (क्रॉनिक लिव्हर फेल्युअर) आजाराने ते ग्रस्त होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय पोस्ट ऑफिस विभागात सहाय्यक अधीक्षक पोस्ट ऑफिसर या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे निधन झाले असून भारतीय डाक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाय्यक अधीक्षक पदावर ते कार्यरत होते.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या कडून अनेक सामाजिक कामांसाठी हातभार लागला होता.त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रमांसाठी सढळ हस्ते मदत केली होती.दानशूर व्यक्तिमत्व म्हणून तेंचि सिंधुदुर्ग मध्ये ओळख होती. 

मनमिळाऊ स्वभाव व एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजात ओळख होती.त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.भारतीय डाक विभागात त्यांनी सहाय्यक अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. शासकीय सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली होती. विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांना त्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली होती. दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची ओळख होती.

मनमिळाऊ स्वभाव, दिलखुलास व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्याची आवड यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच देवगडसह परिसरात शोककळा पसरली असून, सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
Training aircraft skids off the runway at Solapur Airport during takeoff, woman trainee pilot safe
Solapur Airport Incident : सोलापूर विमानतळावर विमानाचा थरारक अपघात; उड्डाणादरम्यान प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
MLA Rohit Pawar : वटवृक्ष स्वामी देवस्थानाला आमदार रोहित पवारांची सदिच्छा भेट
November 12, 2026
Naigaon railway station incident where a woman was allegedly pushed from a local train
लोकलमधील छेडछाडीला विरोध केला अन् तरुणीला ट्रेनमधून ढकलले; नायगावच्या घटनेत तरुणीने गमावला हात
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
MLA Rohit Pawar : वटवृक्ष स्वामी देवस्थानाला आमदार रोहित पवारांची सदिच्छा भेट
November 12, 2026
एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sainik School Exam Schedule : सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक एनटीएकडून जाहीर
November 12, 2026