LIVE UPDATES

धक्कादायक : पुण्यात चक्क 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच घडला 'हंगामा'
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: September 24, 2022 18:19 PM
views 488  views

पुणे : पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात आंदोलन करण्याच्या प्रयत्नादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईमध्ये ही घोषणाबाजी करण्यात आली. पीएफआयविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं नियोजन या आंदोलकांनी केलं होतं. मात्र हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आलं. यावेळी अनेकांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं. यानंतर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळेस आंदोलकांनी ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली. या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाल्याचा उल्लेख यामध्ये पोलिसांनी केला आहे.