शिरोड्याची मालिनी अमरे 'रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र'

Edited by: विनायक गांवस
Published on: December 10, 2024 18:03 PM
views 205  views

सावंतवाडी : शिरोडा वेळागरवाडी येथील मालिनी मदन अमरे  पुणे - आळंदी येथे संपन्न झालेल्या द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत उपविजेता पदावर नाव कोरले. ही स्पर्धा सई तापकीर द रॉयल पेजेंट प्रोडक्शन यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत फायनल राऊंडमध्ये दमदार प्रदर्शन करत मालिनी अमरे यांनी उपविजेते मिळत कोकणचा डंका बजावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.