LIVE UPDATES

CM शिंदे यांच्यावरील आरोपांना नितेश राणे यांचा ठाकरेंना 'करारा जवाब'

Edited by: ब्युरो
Published on: April 13, 2023 11:31 AM
views 2311  views

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. भाजपसोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधलाय.

दिशा सालियान केसचा संदर्भ नितेश राणे यांनी दिलाय. “जेलच्या भितीने एकनाथ शिंदेसाहेब भाजपबरोबर गेले. मग penguin आणि UT ने Disha salain च्या केस च्या भितीने कोणा कोणाचे हात पाय पकडले. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच !!! ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है”, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.