
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूबाबत शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथील डॉक्टरांच्या पथकाने ८ ऑक्टोबर रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, हृदयाच्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी निर्माण होणे आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करणारा आजार हे मृत्यूचे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचेही अहवालात म्हटल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता आपले कौटुंबिक मित्र अमेय नाईक यांना व्हॉट्सॲप संदेश पाठवून प्रकृती ठीक नसल्याचे कळवले होते. त्यानंतर त्यांनी नाईक यांच्याशी दूरध्वनीवरूनही संपर्क साधला.
पहाटे सुमारे ३.३० वाजता मॅसेज पाहिल्यानंतर अमेय नाईक त्यांच्या दोनापावला येथील निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी पाटेकर सोफ्यावर बसलेले असताना अचानक बेशुद्ध झाल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. प्रकृती बिघडल्याने पाटेकर यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. पहाटे सुमारे ४.३० वाजता त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पणजी पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला. त्यानंतर मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांबोळी येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










